Govind Gaude Dainik Gomantak
गोवा

Govind Gaude: 'त्या' लिपिकाला बडतर्फ केल्यावरून क्रीडा मंत्री गोविंद गावडेंना हायकोर्टाची नोटीस

गोपनीय माहिती सोशल मीडियात केली होती शेअर

Akshay Nirmale

Govind Gaude: क्रीडा व युवा व्यवहार संचालनालय कार्यालयातील कनिष्ठ लिपिकाला बडतर्फ केल्यावरून उच्च न्यायालयाने राज्याचे क्रीडा मंत्री गोविंद गावडे यांना नोटीस पाठवली आहे.

गोपनीय माहिती सोशल मीडियावर शेअर केल्याचा ठपका ठेऊन या कर्मचाऱ्याला बडतर्फ करण्याची कारवाई करण्यात आली होती. त्याला संबंधित कर्मचाऱ्याने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्याची न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे.

उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने क्रीडामंत्री गावडे यांच्यासह क्रीडा खात्याच्या कार्यकारी संचालकांना नोटीस बजावली आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी 11 एप्रिल रोजी होणार आहे. विजयकुमार शिरोडकर असे संबंधित कनिष्ठ लिपिकाचे नाव आहे.

त्यांनी याचिकेत राज्याचे मुख्य सचिव, राज्य सरकार, क्रीडा मंत्री गोविंद गावडे, क्रीडा व युवा व्यवहार संचालक आणि कार्यकारी संचालक यांना प्रतिवादी केले आहे. बडतर्फीच्या आदेशाबाबत केलेली सर्व प्रक्रिया मागवून घेण्याची मागणी याचिकेत केली आहे.

गोव्यात झालेल्या 17 वर्षांखालील महिला फुटबॉल विश्वचषकाच्या कार्यक्रमाचे 3.04 कोटी रुपयांचे कंत्राट निविदा न काढता एका कार्यक्रम व्यवस्थापन कंपनीला दिले, ही गोपनीय माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.

त्याबद्दल कार्यकारी संचालकांनी सर्व कर्मचाऱ्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली होती. सर्व कर्मचाऱ्यांना क्रीडामंत्र्यांसमोर बोलावून शिरोडकर यांच्यावर संशय ठेवण्यात आला होता. त्यानंतर शिरोडकर यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Hard Decision! विश्वचषक संघातून शुभमन गिलला डच्चू का? कॅप्टन सूर्याने सांगितलं संघ निवडीमागचं 'ते' मुख्य कारण

Sunburn Festival: 'गोव्याशी तुलना करू शकत नाही...' मुंबईतील पहिल्या सनबर्न फेस्टिव्हलबाबत 'EDM' चाहत्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया

अक्षय खन्नावर कौतुकाचा वर्षाव, आर. माधवनचा होतोय जळफळाट? म्हणाला, "तो स्वतःमध्येच..."

Imran khan: इम्रान खानचे पाय आणखी खोलात; पत्नी बुशरा बीबीसह 17 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, भ्रष्टाचारप्रकरणी न्यायालयाचा मोठा निर्णय

VIDEO: अफलातून कॅच! मार्नस लॅबुशेची हवेत उडी अन् एका हाताने भन्नाट झेल, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT