Goa Highway: राष्ट्रीय महामार्ग 66 चे होणार रूंदीकरण; संपादित जमिनीचे सर्व्हेक्षण सुरू

सरकार 31 मार्चपर्यंत केंद्राला डीपीआर सादर करण्याची शक्यता
Highways
HighwaysDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Highway: सार्वजनिक बांधकाम विभागाने (पीडब्लूडी) राष्ट्रीय महामार्ग 66 च्या बाजूने नावेली जंक्शन ते उस्कीबंदपर्यंत संपादित केलेल्या जमिनीचे सर्वेक्षण करण्याचे काम सुरू केले आहे. सरकार 31 मार्चपर्यंत केंद्राला सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) सादर करण्याची शक्यता आहे.

Highways
Vasco-Okha Train: गोव्यातून थेट गुजरातसाठी रेल्वे; वास्को-ओखा विशेष एक्सप्रेस 'या' तारखेपासून सुरू होणार

PWD ने यापूर्वी राष्ट्रीय महामार्ग 66 च्या सध्याच्या संरेखनात नावेली ते उस्कीबंदपर्यंत जमीन संपादित केली होती. काही ठिकाणी संपादित केलेली जमीन 40 मीटरपर्यंत आहे आणि जवळपास 7 किलोमीटरचा संपूर्ण भागाचे सर्व्हेक्षण होणार आहे.

या प्रकल्पाचे सल्लागार डीपीआरला अंतिम रूप देण्याच्या प्रक्रियेत आहेत. निधी वाटपासाठीचा अंदाज केंद्र सरकारकडे पाठवला जाणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग 31 मार्चपूर्वी केंद्राला डीपीआर सादर करण्याचा विचार करत आहे आणि एकदा निधी वाटप झाल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग 66 च्या रुंदीकरणाचे काम सुरू होईल.

दरम्यान, या रस्त्यामध्ये दोन लहान पुलांसह महामार्गाच्या वाढलेल्या पट्ट्याचाही समावेश आहे. ​​चिंचणीच्या ग्रामस्थांच्या मागणीनुसार विद्यमान संरेखन बदलण्यास अजिबात वाव नाही, असेही सांगण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Water Crisis
Goa Education
MGP political controversy
Center Sanctioned ₹1,880 Cr for NH-66 4-Laning in South Goa
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com