Vasco-Okha Train: गोव्यातून थेट गुजरातसाठी रेल्वे; वास्को-ओखा विशेष एक्सप्रेस 'या' तारखेपासून सुरू होणार

जूनपर्यंत 14 फेऱ्या करणार
Trains
TrainsDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Vasco-Okha Train: वास्को ते ओखा साप्ताहिक विशेष एक्सप्रेस ऐन सुट्टीच्या हंगामात 28 मार्चपासून धावणार आहे. त्यामुळे गोव्यातून थेट गुजरातला जाणाऱ्या प्रवाशांची सोय झाली आहे.

वास्को-ओखा विशेष एक्स्प्रेस ओखा येथून 28 मार्च रोजी रात्री 9 वाजता निघेल व 30 मार्च रोजी सकाळी 8 वाजता वास्को येथे पोहोचेल. वास्को-ओखा एक्स्प्रेस 30 मार्च रोजी दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी परतीच्या प्रवासाला निघेल.

ही गाडी ओखा ते वास्को 28 मार्च, 04, 11, 18, 25 एप्रिल, मे महिन्यातील 02, 09, 16, 23, 30 आणि जूनमधील 06, 13, 20, 27 या तारखांना धावेल. ही गाडी एकूण 14 फेऱ्या करणार आहे.

वास्को ते ओखा 30 मार्च, त्यांतर 06, 13, 20, 27 एप्रिल, त्यानंतर मे मधील 04, 11, 18, 25 आणि जूनमधील 01, 08, 15, 22, 29 या तारखांना धावेल, एकूण 14 फेऱ्या करेल.

Trains
Narendra Singh Tomar : गोव्यातील मातीचा ऱ्हास थोपविणार!

ही एक्स्प्रेस मडगाव, लोंढा, बेळगाव, मिरज, सातारा, पुणे, लोणावळा, कल्याण, कामन रोड, वसई रोड, वापी, सुरत, भरुच, बडोदा, नादीद, अहमदाबाद, राजकोट, द्वारका या स्थानकावर थांबेल.

ओखा-वास्को एक्स्प्रेस मिरजेत प्रत्येक बुधवारी रात्री 11 वाजून 35 मिनिटांनी येईल व वास्को-ओखा एक्स्प्रेस मिरजेत प्रत्येक गुरुवारी रात्री 10 वाजता येईल. दरम्यान, 28 मार्चपासून हुबळी ते राजकोट अशी विशेष एक्सप्रेसही सुरू होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

EPFO PF Withdrawal Via UPI Google Pay PhonePe
Narendra Modi 25 years in government
SIR Controversy
Goa 97 Voters Electoral Roll
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com