Goa Bombay High Court Gomantak Digital Team
गोवा

Goa Land Grab Case: मनी लाँड्रिंग आणि जमीन हडप प्रकरणातील संशयित विक्रांत शेट्टीला सशर्त जामीन!

High Court Grants Bail to Vikrant Shetty: मनी लाँड्रिंग आणि जमीन हडप प्रकरणातील मुख्य संशयित विक्रांत शेट्टीला उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला.

Manish Jadhav

Goa Land Grab Case: मनी लाँड्रिंग आणि जमीन हडप प्रकरणातील मुख्य संशयित विक्रांत शेट्टीला उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला. न्यायालयाने विक्रांतला 5 लाखांच्या जातमुचलक्यासह अटींवर सशर्त जामीन मंजूर केला.

बनावट कागदपत्रांच्या साहाय्याने जमीन हडप करुन इतरांना विकल्याप्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) अनेक प्रकारच्या षडयंत्रांचा सूत्रधार असलेल्या विक्रांत शेट्टी याच्या विरोधात गुन्हा नोंदवत मुसक्या आवळल्या होत्या.

पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासामध्ये शेट्टी हा अनेक जमीन हडप प्रकरणांमध्ये सहभागी असून पोलिसांनी त्याला लक्ष्य करत चारी बाजूंनी फास घट्ट केला होता.

विशेष तपास सुरु केला होता

दरम्यान, खोट्या कागदपत्रांच्या साहाय्याने रिकाम्या जागा हडप करुन दुसऱ्यांना विकल्याच्या अनेक तक्रारी आल्यानंतर राज्य सरकारने गुन्हा अन्वेषण विभागाच्या मदतीने विशेष तपास पथक स्थापन करुन तपास सुरु केला होता. विविध पोलिस स्थानकांमध्ये अशा प्रकारच्या नोंद असलेल्या तक्रारी या एसआयटीकडे वर्ग करण्यात आल्या होत्या.

पोलिसांनी प्रत्येक प्रकरणाची स्वतंत्र चौकशी सुरु करुन संबंधित गुन्हेगारांचे अटक सत्र सुरु केले होते. यापूर्वी 18 जून 2022 रोजी एसआयटीने शेट्टीला अटक केली होती. याच प्रकरणात अभिलेखागार विभागातील दोन कर्मचाऱ्यांनाही अटक (Arrested) करण्यात आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT