Court | Goa Crime News  Dainik Gomantak
गोवा

Goa Court News : सुनावणी न झाल्याने नायजेरियनला ड्रग्जप्रकरणी उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

पोलिसांकडून गोवा खंडपीठात आरोपपत्र दाखल

दैनिक गोमन्तक डिजिटल

ड्रग्जप्रकरणी अटक करण्यात आलेल्या नायजेरियन इझेजी नॅडी किंग्स्ले याच्याविरुद्ध पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे, परंतु तो एक वर्षाहून अधिक काळ न्यायालयीन कोठडीत आहे व खटल्यावरील सुनावणीला विलंब होत असल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने त्याला सशर्त जामीन मंजूर केला आहे.

उच्च न्यायालयाने दिलेल्या जामीन आदेशात संशयित इझेझी याला वैयक्तिक १ लाखांची हमी तसेच तत्सम रक्कमेचा एक हमीदार सादर करावा. त्याने कायदेशीर पासपोर्ट तसेच व्हिसा सादर करावा. तो नसल्यास त्यासाठी ऑनलाईनवरून कोठडीतून अर्ज करावा. त्यासाठी कारागृहातील अधिकाऱ्यांनी मदत करावी.

अधिकृत पासपोर्ट व व्हिसा असल्याशिवाय जामीन दिला जाणार नाही. त्याची एक प्रत न्यायालयात सादर करावी. पासपोर्टवर असलेल्या पत्त्यावर त्याने मोबाईल सिमकार्ड घ्यावे व त्या मोबाईलचा क्रमांक न्यायालयाला द्यावा. तो गोव्यात राहत असल्यास त्याने अधिकृत पत्ता पुराव्यानिशी सादर करावा.

जामिनावर बाहेर आल्यावर त्याने प्रत्येक सोमवारी सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत खटल्यावरील सुनावणी पूर्ण होईपर्यंत म्हापसा पोलिस स्थानकात हजेरी लावावी. सुनावणीवेळी न्यायालयात हजर राहावे तसेच साक्षीदारांना धमकावणे व त्यांना आमिषे दाखवण्याचा प्रयत्न करू नये अशी अटी घालण्यात आल्या आहेत.

म्हापसा पोलिसांनी ३ मार्च २०२२ रोजी संशयित इझेजी याला ३० ग्रॅम कोकोनसह बोडगिनी - म्हापसा येथे अटक केली होती. त्याला पोलिस कोठडीनंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. दरम्यानच्या काळात त्याने सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. तो १३ मे २०२२ रोजी फेटाळण्यात आला होता.

त्यावेळी त्याने आर्थिक स्थिती बिकट असल्याचे कारण दिले होते व पूर्णपणे तो काकाने पाठवलेल्या पैशांवर अवलंबून असल्याचे नमूद केले होते. तपास पूर्ण होऊन न्यायालयात आरोपपत्र सादर करण्यात आले आहे. त्यामुळे जामीन द्यावा अशी विनंती उच्च न्यायालयात केलेल्या अर्जात करण्यात आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Bomb Blast: पाकिस्तान हादरलं! खैबर पख्तूनख्वामध्ये नमाजादरम्यान रक्ताचा सडा; भीषण आत्मघाती हल्ल्यात 16 ठार, 50 हून अधिक जखमी

Abhishek Sharma Shiva Celebration: 'प्लेयर ऑफ द सिरीज' ठरल्यानंतर अभिषेक शर्माचा मोठा खुलासा, सेंच्युरीनंतरच्या 'शिव सेलिब्रेशन'विषयी स्पष्टच सांगितलं; म्हणाला...

Porvorim Traffic Congestion: 'उन्‍नत'मार्गावर प्रगती, रस्त्यावर मात्र कोंडी

Jos Buttler World Record: 9 शतके, 107 अर्धशतके अन् 15000 धावा! टी-20 मध्ये बटलरने रचला नवा इतिहास; अशी कामगिरी करणारा बनला जगातील पहिलाच फलंदाज VIDEO

Mapusa Kidnapping Case: दोन अपहरण प्रकरणे, दोन राज्यात तपास अन् चौघांची सुखरुप सुटका, म्हापसा पोलिसांची धडक कारवाई; एक संशयित गजाआड

SCROLL FOR NEXT