Goa Mining : स्थानिकांनाच खाणींमध्ये प्राधान्य द्यावे : कामगार नेते पुती गावकर

सरकारने दिलेले आश्‍वासन पाळावे
Goa Mine Project | Puti Gaonkar
Goa Mine Project | Puti GaonkarDainik Gomantak
Published on
Updated on

राज्यात खाणींचा लिलाव होऊ लागला आहे. काही मोठे उद्योग या खाणी लिलावामध्ये खरेदी करत आहे. लिलावामधून गोव्यातील खाणी कोणीही खरेदी केल्या तरी तेथील कामासाठी बेरोजगार असलेल्या गोव्यातील खाण कामगारांना व त्यावरील अवलंबितांना प्राधान्य मिळायले हवे.

जर परप्रांतीय कामगारांना खाणींच्या कामासाठी घेण्याचा प्रयत्न खाण उद्योगांनी केला, तर त्याला विरोध केला जाईल. सरकारने खाण कामगारांना दिलेले आश्‍वासन पाळण्याची गरज आहे, असे स्पष्ट मत खाण कामगार नेते पुती गावकर यांनी आज कामगारदिनाच्या कार्यक्रमानंतर सांगितले.

खाणींचा नव्याने लिलाव सुरू झाला आहे. त्यामुळे जे बेरोजगार खाण कामगार आहेत तसेच या खाणींवर प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या अवलंबून असलेल्या ट्रकचालक व मशिनरी मालकांना काम मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Goa Mine Project | Puti Gaonkar
Dharmesh Saglani: मुख्यमंत्र्यांची भेट हवी? माझ्याबरोबर या!

गोव्यातील खाण व्यवसाय हा मोठ्या उद्योगांकडे जाणार आहे हे अनेक वर्षांपूर्वी म्हटले होते ते आता सत्यात उतरत आहे. जिंदाल कंपनीने कुडणे येथील मायनिंग ब्लॉक लिलावातून खरेदी केला आहे.

राज्यातील खाणी जेव्हा सुरू होतील तेव्हा बेरोजगार झालेल्या खाण कामगारांना तसेच अवलंबितांना प्राधान्य दिले जाईल असे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मान्य केले होते. आता ते विद्यमान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मान्य करण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.

‘खाण महामंडळ स्थापन करावे’"

खाणी बंद झाल्यानंतर राज्यात खाण महामंडळ स्थापन करण्याची आश्‍वासने वेळोवेळी दिली गेली आहेत. मात्र, अजूनही त्याची पूर्तता होत नाही. त्याला तीन वर्षे उलटून गेली तरी महामंडळ अजूनही स्थापन होत नाही.

काही खाणींच्या क्षेत्रात खनिज मिश्रित माल साठा (डंप) आहे. त्याचा ई लिलाव करून तो उचलण्यास परवानगी दिलेली आहे. मात्र, या डंपमध्ये मोठ्या प्रमाणात खनिज मालही आहे. मात्र, ज्या पद्धतीने हा माल उचलण्याचे काम सुरू आहे, त्यावर सरकारचे नियंत्रण नाही. जरी काही खाणींच्या ब्लॉकचा लिलाव झाला असला तरी त्या लवकर सुरू होत नाहीत. त्या लवकर सुरू करण्यासाठी सरकारने पावले उचलण्याची गरज आहे, असे मत पुती गावकर यांनी मांडले.

Goa Mine Project | Puti Gaonkar
SCO Meeting in Goa: शांघाय परिषदेची तयारी पोहोचली अंतिम टप्प्यात; बाणावलीत कडक बंदोबस्‍त

...तर खाणी सुरू करू देणार नाही.

खाणी बंद झाल्या तरी खनिजवाहू ट्रक तसेच मशिनरी मालकांनी त्या चालू स्थितीत ठेवण्यासाठी त्याची वारंवार दुरुस्ती करून घेतली आहे. त्यासाठी त्यांनी कर्जे तसेच घरातील मौल्यवान वस्तू गहाण ठेवून कर्जे घेतलेली आहेत.

त्यामुळे खाणींच्या लिलावात यशस्वी झालेल्या परप्रांतीय खाण उद्योगांनी कामगार गोव्याबाहेरून आणल्यास किंवा स्थानिक मशिनरी मालकांना काम न देता बाहेरून आणल्यास त्याला विरोध केला जाईल. जोपर्यंत स्थानिकांना प्राधान्य दिले जाणार नाही, तोपर्यंत या खाणी सुरू करण्यास दिले जाणार नाही, असा इशारा पुती गावकर यांनी दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com