Mining Transport in Mayem Dainik Gomantak
गोवा

मयेतून होणाऱ्या खनिज वाहतुकीला हायकोर्टाची स्थगिती

गोवा खंडपीठाचा दणका, प्रदूषण मंडळाकडून देखरेख यंत्रणेकडे दुर्लक्ष

दैनिक गोमन्तक

पणजी : मये गावातून सुरु असलेल्या बेकायदा खनिजवाहू ट्रकांच्या वाहतुकीला आज बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने अंतरिम आदेशाद्वारे बंदी घातली. पिसुर्लेपाठोपाठ आता मये गावातूनही खनिज वाहतुकीला स्थगिती दिल्याने खाण कंपन्यांना चांगलाच दणका बसला आहे. जोपर्यंत या गावात प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे या खनिजवाहू ट्रकांच्या वाहतुकीवर देखरेख ठेवण्यासाठी यंत्रणा उभारली जात नाही तोपर्यंत हा आदेश कायम असेल असे खंडपीठाने स्पष्ट केले.

गोवा फाऊंडेशन आणि मुळाक खाजन शेतकरी असोसिएशनतर्फे मये गावातून होत असलेल्या बेकायदा खनिज वाहतुकीविरोधात याचिका सादर करण्यात आली आहे. या वाहतुकीमुळे रस्त्याच्या बाजूने असलेली पाण्याची पाईपलाईन वारंवार फुटत असल्याने पाणी वाया जात आहे आणि या गावातील लोकांना पाण्याची टंचाई भासत आहे. खनिजवाहू करणाऱ्या अकरा खाण कंपन्यांना याचिकेत प्रतिवादी करण्यात आले आहे. याचिकेवरील सुनावणी पूर्ण होईपर्यंत सर्व खाण कंपन्यांना मये गावातून खनिज वाहतूक करण्यास आणि मये येथील खाणपट्टी टीसी क्रमांक 5/49 व 13/49 मधील साठा करुन ठेवण्यात आलेला खनिज माल (डंप) उचलण्यास बंदी घालताना अंतरिम आदेश गोवा खंडपीठाने दिला आहे. पुढील सुनावणी १६ जूनला ठेवली आहे.

खनिजवाहू ट्रक मये गावातील रस्त्यावरुन जात आहेत, त्या ठिकाणी प्रदूषण नियंत्रण मंडळाने धूळ प्रदूषण आणि ट्रकांवर देखरेख ठेवण्याची सिस्टीम उभारलेली नाही. 2020 साली यासंदर्भात मंडळानेच ही देखरेख सिस्टीम यंत्रणा सक्तीची केली होती. मात्र ती उभारलेली नाही हे मंडळाने मान्य केले आहे. यावर्षीच्या जानेवारी महिन्यात खनिजवाहू ट्रक मये गावातून जात असल्याने पाण्याची पाईपलाईन फुटली होती. लोकांनी त्याविरुद्ध आंदोलन केल्यावर काही दिवस ही वाहतूक थांबवण्यात आली. पाईपलाईन दुरुस्त करण्यात आल्यावर ही वाहतूक पुन्हा सुरू झाली. पुन्हा 28 मार्चला पाईपलाईन फुटली. त्यामुळे बेकायदा खनिज मालाची सुरू असलेली वाहतूक बंद करण्यात यावी अशी विनंती याचिकादाराच्या वकील नॉर्मा आल्वारिस यांनी केली.
या मये गावातून टीसी क्रमांक 5/49 आणि 13/49 मधील खनिजची वाहतूक करण्यात येत असली तरी त्या ठिकाणी देखरेख यंत्रणा नाही याची माहिती दिली नसल्याचे खाण खात्यातर्फे सांगण्यात आले. ही यंत्रणा उभारण्यासाठी तेथील महामाया वाचनालयाजवळ जागा पाहण्यात आली आहे. ही यंत्रणा उभारून खाण कंपन्यांकडून त्याचा खर्च वसूल केला जाईल, अशी माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिली.

याचिकेत मये गावातून खनिज मालाची वाहतूक करत असलेल्या खाण कंपन्या आणि यंत्रसामग्री कंपन्या असलेल्या 11 जणांना प्रतिवादी करण्यात आहे, तसेच त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. जोपर्यंत प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे मये गावात या खनिजवाहू ट्रकांवर देखरेख यंत्रणा उभारण्यात येत नाही तोपर्यंत ही वाहतूक बंद असेल. ही यंत्रणा उभारण्यात आल्यावर कंपन्यांना या वाहतुकीवरील बंदी उठवण्यासाठी अर्ज करण्यासाठी मुभा देण्यात येत असल्याचे स्पष्ट केले आहे.
वाहतुकीस बंदी घालण्यात आल्याने सरकारने मये गावातून जाणारी पाईपलाईन वारंवार ट्रकांच्या वाहतुकीमुळे फुटत आहे त्यामुळे त्याची तपासणी करण्यात यावी आणि त्याचा अहवाल सादर करावा. जर तेथे दुरुस्ती करण्याची आवश्‍यकता असल्यास त्याचे काम लवकर हाती घेतले जाईल आणि त्याची माहिती नोंद केली जाईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवी ब्रह्मचारिणीची कृपा! सिंह, धनुसह 'या' 4 राशींना होणार लाभ; वाचा 12 राशींचे राशिभविष्य

Sangameshwar Chalukya Dynasty: संगमेश्वरच्या चालुक्य राजघराण्याचा पराक्रमी इतिहास! पोर्तुगीज आणि आदिलशाहीला दिले होते कडवे आव्हान

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

SCROLL FOR NEXT