Sonsodo Project Dainik Gomantak
गोवा

सोनसोडो कचरा विल्हेवाटीचे कंत्राटदाराने वेळापत्रक सादर करावे

गोवा खंडपीठाचे आदेश, सोनसोडो कचरा विल्हेवाटबाबत सुनावणी 2 मे रोजी

दैनिक गोमन्तक

पणजी : सोनसोडो कचरा विल्हेवाट केव्हापर्यंत पूर्ण होईल याचे वेळापत्रक त्वरित द्या, असे तोंडी निर्देश देत मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने जनहित याचिकेवरील सुनावणी २ मे पर्यंत तहकूब केली. मे. हिंदुस्तान वेस्ट ट्रिटमेंट प्रा. लि., कंपनीने कामासंदर्भात दिलेली माहिती समाधानकारक नाही. हे काम वेळेत न करण्याचे वा ते पूर्ण न करण्याच्या सबब दिल्या जात असल्याची टिप्पणी आदेशात केली आहे.

मागील सुनावणीवेळी गोवा खंडपीठाने सोनसोडो कचरा विल्हेवाटप्रकरणी होत असलेल्या विलंबामुळे कंत्राटदाराची बाजू ऐकून घेण्यासाठी त्याला प्रतिवादी केले होते व प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले होते. त्यानुसार आज दिलेल्या माहिती त्यांनी सोनसोडो येथील सुमारे ५० टक्के कचरा विल्हेवाटीचे काम पूर्ण झाले आहे व त्या ठिकाणी अधिकाधिक यंत्रसामग्री तसेच मनुष्यबळ वाढवून हे काम जलदगतीने सुरू आहे असे त्यात नमूद केले आहे. या जुन्या कचऱ्यापासून निर्मित होणारे रेमेडिएशनसाठी तेथे जागा नसल्याने अडचणींना सामोरे जावे लागत आहे. कंत्राटदाराने मडगाव पालिकेचे कचरा विल्हेवाटीसंदर्भातचे काम घेतले आहे तरी सोनसोडो येथील कामात विलंब झालेला नाही. हे काम कोविड काळात व अवकाळी पडणाऱ्या पावसामुळे करणे शक्य नसल्याने अडचणी आल्या आहेत. पुढील वर्षापर्यंत जी मुदत आहे त्या वेळेत हे काम पूर्ण होईल असा दावा कंत्राटदाराच्या वकिलांनी केला.

यावेळी मडगाव पालिकेतर्फे वकिलांनी बाजू मांडताना स्पष्ट केले की सोनसोडो कचरा विल्हेवाटचे काम करणाऱ्या कंत्रादाराला पालिकेचा कचऱ्याचेही काम दिले असले तरी त्यांना तशी सक्ती केलेली नाही. कंत्राटदाराने हे काम स्वीकारले त्याच्याशी पालिकेचा काहीही संबंध नाही.

ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी सरकारतर्फे बाजू मांडताना सांगितले की, कंत्राटदाराला काम वेळेत पूर्ण करण्याचे वेळापत्रक काम देतानाच देण्यात आलेले आहे. कालच या कचऱ्यासंदर्भात उच्चाधिकार समितीची बैठक झाली आहे व त्यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यांना येणाऱ्या अडचणी हा त्यांचा प्रश्‍न आहे. यावेळी खंडपीठाने हस्तक्षेप करत तोंडी निरीक्षण केले की यावर प्रश्‍नावर तोडगा काढण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या तसेच कंत्राटदाराकडून बँक हमी घ्या. त्यामुळे ते वेळेत काम करण्यासाठी प्रयत्न करतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

महिंद्राची नवी CNG SUV बाजारात; 9.99 लाखांपासून किंमत, दमदार लूकसह टाटा नेक्सॉन आणि ब्रेझाला देणार टक्कर

Ranji Trophy 2026: पिठिया-भार्गवच्या फिरकीपुढे गोव्याची शरणागती! बडोद्याचा डाव व 135 धावांनी दणदणीत विजय

SCROLL FOR NEXT