PM Narendra Modi Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील सहा बालकांना पंतप्रधानांतर्फे मदतीचे वाटप

पीएम केअर फॉर चिल्ड्रन योजना : विश्‍वजीत राणे यांच्या हस्ते किट सुपूर्द

दैनिक गोमन्तक

पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी पीएम केअर फॉर चिल्ड्रन योजनेअंतर्गत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे लाभ जारी करण्यात आले. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, मंत्रिमंडळाचे इतर अनेक सदस्य, मुख्यमंत्री या कार्यक्रमात सहभागी झाले होते. मुलांसाठी गेल्यावर्षी सुरू केलेल्या पी एम केअर्स योजनेच्या लाभार्थ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून यावेळी संवाद साधला.

राज्यात कोरोना काळात अनाथ झालेल्या 6 बालकांना पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन अंतर्गत किटचे वाटप करण्यात आले. उत्तर गोव्यात आदिती कळंगुटकर यांना आरोग्य, नगर विकास आणि महिला व बालकल्याणमंत्री विश्‍वजीत राणे यांच्या हस्ते मदतीचे कीट सूपूर्द केले. तर दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमात 5 बालकांना (2 मुली, 3 मुले) यांना जिल्हाधिकारी ज्योती कुमारी यांच्या हस्ते मदत देण्यात आली.

कुटुंबातील सदस्यासारखा आधार देणार

पीएम केअर्स किटमध्ये बालकांसाठी बँक पासबूक, आयुष्यमान भारत-पंतप्रधान जन आरोग्य योजनेअंतर्गत हेल्थ कार्ड आहे. कोरोनाचा फटका बसलेल्या या मुलांच्या आयुष्यात बदल घडवण्याचा पीएमकेअर्स हा छोटा प्रयत्न आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनाथ मुलांच्या पाठीशी उभे राहून त्यांच्या कुटुंबातील सदस्यासारखा आधार देण्याची ग्वाही दिली असून या मुलांना आयुष्यात पुढे जाण्याचे आवाहन याप्रसंगी मान्यवरांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT