CM Pramod Sawant
CM Pramod SawantDainik Gomantak

भाडेकरूंची माहिती न दिल्यास कारवाई होणार

अटक वा दंडाची शिक्षा : घरमालकांना मुख्यमंत्र्यांचा इशारा
Published on

पणजी : राज्यात वाढणाऱ्या गुन्हेगारीच्या पार्श्‍वभूमीवर व गुन्ह्यांवर आळा आणण्यासाठी सरकारने भाडेकरूंची पडताळणी करण्याचे निर्देश दिले असून त्याची प्रक्रिया पोलिस खात्याने सुरू केली आहे. ज्या मालकांनी भाडेकरूंची माहिती पोलिसांत दिलेली नाही, त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले.

गेल्या काही दिवसांत राज्यात चोऱ्या व लुटण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडल्याने यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना विचारले असता ते म्हणाले, भाडेकरू पडताळणी कायद्याखाली पोलिसांना कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार पोलिसांनी भाडेकरूंची पडताळणी करणे सुरू केल्याचे त्यांनी सांगितले.

CM Pramod Sawant
गोमेकॉतील ‘त्या’ डॉक्टरांवर केलेली कारवाई संशयास्पद

पोलिसांकडून कडक कारवाईची गरज

राज्यात अनेक घरमालक वा फ्लॅटमालक भाडेकरूची माहिती पोलिसात देणे सक्तीचे असूनही ते देत नाहीत. अनेकदा भाडेकरू गुन्हे करून पसार झालेले असतात. मात्र, तपासकामात ही माहिती नसल्याने अडचणी येतात. माहिती न देणाऱ्या घरमालकांवर कडक कारवाई पोलिस करत नाहीत. त्यामुळे घरमालक त्याचा गैरफायदा घेऊन भाडेकरूची माहिती देण्याबाबत असलेले गांभिर्य लक्षात घेत नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com