Pilerne Truck Fire Dainik Gomantak
गोवा

Pilerne Truck Fire: पिळर्ण येथे कंपनीत मालवाहू ट्रकला आग, कंपनी कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळाला

अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल होण्यापूर्वीच कंपनीमधील कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले आणि मोठा अनर्थ टळला.

Pramod Yadav

Pilerne Truck Fire: पिळर्ण औद्योगिक वसाहतीत एका ट्रकला अचानक आग लागली. यामध्ये ट्रक चालक किरकोळ जखमी झाला असून, दरम्यान, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल होण्यापूर्वीच कंपनीमधील कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले आणि मोठा अनर्थ टळला.

मिळालेल्या माहितीनुसार, पिळर्ण येथील पर्ल कंपनीत गुजरात पासिंग (GJ12AW4135) या ट्रकला अचानक आग लागली. ट्रकचे इंजिन ओव्हर हिट झाल्यामुळे ही आग लागल्याचे निष्पण्ण झाले.

दरम्यान, कंपनीतील कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवत आगीवर नियंत्रण मिळवले. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल होण्यापूर्वीच कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले यामुळे मोठा अनर्थ टळला.

दरम्यान, या घटनेत ट्रकचा चालक किरकोळ जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याापूर्वी देखील पिळर्ण औद्योगिक वसाहतीत एका कंपनीला भीषण आग लागली होती. जानेवारीत बर्जर बेकर कोटिंग प्रा. लि. या कंपनीत मोठी आग लागली. गोव्याच्या इतिहासातीली ही एक भीषण आग असल्याचे बोलले जाते. या आगीत 40 दुचाकी भस्मसात झाल्या असून कंपनीचेही कोट्यवधींचे नुकसान झाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

धक्कादायक! 'गोवा सोड अन्यथा..', धमकी देत मारहाण करणाऱ्या 'मगो'च्या नेत्याला अटक

Goa Cabinet: दोन दिवसांत गोवा मंत्रीमंडळात फेरबदल? मुख्यमंत्री सावंतांची दिल्लीत खलबंत, मंत्री-नेत्यांशी भेटीगाठी

Cryptocurrency: ''...तर आज तुम्ही 2450 कोटींचे मालक असता'', बिटकॉइनने गुंतवणूकदारांना केलं मालामाल!

IFFI Goa: 'चोला' चित्रपटाला करणी सेनेचा विरोध; भगवे कपडे, तुळस- रुद्राक्षाच्या सीनवर आक्षेप, यॉटवर ज्येष्ठ अभिनेत्यासमोर राडा

Goa Live News: मांद्रेचे माजी सरपंच प्रशांत नाईक यांच्याकडून 350 पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत!

SCROLL FOR NEXT