Goa Traffic Jam Dainik Gomantak
गोवा

Goa Traffic Jam: पणजी-मडगाव मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; सकाळपासून वाहनांच्या रांगा, रूग्णवाहिकाही अडकली...

डोकं नसलेल्या भाजप सरकारचे आभार; दुर्गादास कामत यांचा टोला

Akshay Nirmale

Goa Traffic Jam: नवा झुआरी पूल पूर्णत्‍वास येत आहे खरा; परंतु कधी एकदा 29 तारीख उजाडतेय आणि तो वाहतुकीस खुला होतोय, असे हजारो वाहनचालकांना झाले आहे. मंगळवारी पणजी-मडगाव मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. सकाळपासूनच या मार्गावर वाहनचालकांच्या रांगा लागल्या होत्या. याचा फटका रूग्णवाहिकेलाही बसला.

दरम्यान, या वाहतुकी कोंडीची रियल टाईम गुगल इमेज गोवा फॉरवर्ड पार्टीचे प्रवक्ता दुर्गादास कामत यांनी ट्विट केली आहे. त्यांनी लोकांना झालेल्या त्रासावरून नाराजी व्यक्त करत, डोकं नसलेल्या या भाजप सरकारचे आभार, असे ट्विट करत राज्य सरकारला टोला मारला आहे.

सलग तीन दिवस कुठ्ठाळी भागात सायंकाळच्‍या वेळी तासनतास वाहतूकोंडी होत आहे. मंगळवारी तर सकाळपासूनच हा सिलसीला सुरू झाला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नव्या झुआरी पुलावर सायंकाळच्‍या वेळी नागरिकांना प्रवेशाची मुभा दिल्‍यानंतर कुठ्ठाळी भागात लोकं वाहने ठेवून पुलावर जात आहेत. त्‍यामुळे सायंकाळनंतर वाहतुकीचे तीन-तेरा वाजत आहेत. पणजीहून कामावरून थकून-भागून मडगावकडे जाणाऱ्या नोकरदार, प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे. वाहतूक पोलिसांचे नियंत्रण सुटले आहे.

रुग्‍णवाहिकेला फटका

मंगळवारी एक रुग्‍णवाहिका बराचकाळ वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्‍याचा प्रयत्‍न करत होती. अशा स्‍थितीत एखाद्या अत्‍यवस्‍थ रुग्‍णाचा मृत्‍यू झाल्‍यास त्‍याला जबाबदार कोण, असा सवाल उपस्‍थित करण्‍यात येत आहे.

वाहतूक पोलिसांचे स्पष्टीकरण

वाहतूक पोलिस अधीक्षक बोसुएट म्‍हणाले की, गेल्या काही दिवसांपासून वाहने घेऊन येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे. ठिकठिकाणी महामार्गाचीही कामे सुरू आहेत. सध्‍या लोकांना या पुलावर चालत जाण्यास व आस्वाद घेण्यास सरकारने मुभा दिली आहे. हे लोक वाहने रस्त्याच्या बाजूला उभी करत आहेत. जुन्या झुआरी पुलावर होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे मागे-पुढे वाहने करताना किरकोळ अपघात घडत आहेत. काही गाड्या पुलावर बंद पडल्याने ही वाहतुकीची कोंडी गेल्या काही दिवसांपासून होत आहे. ब्रेकडाऊन झालेली वाहने बाजूला करण्यासाठी तसेच अपघातांचा पंचनामा करताना पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa Live Updates: इंडिया आघाडीच्या नेत्याच्या प्रचारासाठी विजय सरदेसाई महाराष्ट्रात!

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

SCROLL FOR NEXT