GMC : कोरोनाविरोधात लढ्यासाठी गोवा किती सज्ज? जीएमसीत ‘बीएफ-7’ साठी मॉकड्रिल

आरोग्य यंत्रणा सतर्क; ऑक्सिजन, आयसीयू बेडची तपासणी सुरु
GMC
GMCDainik Gomantak

चीनसह विविध देशांमध्ये हाहाकार माजवणाऱ्या कोरोनाच्या बीएफ-7 या व्हेरिएंटचे संभाव्य संक्रमण रोखण्यासाठी राज्यातील आरोग्य यंत्रणा कशी तयारी आहे? यासाठी केंद्रीय आरोग्य यंत्रणेच्या सूचनेनुसार आज मंगळवारी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात मॉकड्रिल करण्यात आले. आरोग्य सचिव अरुण कुमार मिश्रा आणि जीएमसीचे डीन डॉ. जे. पी. तिवारी हे यावेळी उपस्थित होते.

कोरोना काळातील यापूर्वीच्या अनुभवतील त्रुटी राहू नयेत, यासाठी केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना आपली यंत्रणा सतर्क करण्याच्या सूचना केल्या आहेत. यानुसार जीएमसी हे मॉकड्रिल झाले. यावेळी या संभाव्य कोरोना लाटेला रोखण्यासाठी सर्व आरोग्य यंत्रणेची तपासणी करण्यात आली. यावेळी कोविड नोडल अधिकारी डॉ. बालरोगतज्ज्ञ विरल खांडेपारकर, डॉ. वैशाली जोशी, डॉ. जगदीश काकोडकर, डॉ. जोश पिंटो, डॉ. मुकेश कांबळे, डॉ. प्रीती वरघसे, डॉ शेट्ये, डॉ. संजय पांढरबळे उपस्थित होते.

GMC
Sunburn Goa: जगातील टॉप 8 डीजे करणार सनबर्न फेस्टिव्हल मध्ये परफॉर्म

मॉक ड्रिलमध्ये कोणत्या बाबींच्या पूर्ततेची माहिती घेण्यात आली?

1) खाटांची उपलब्धता : अलगीकरणासाठीची खाटा, ऑक्सिजन आवश्यक असलेले खाटा, आयसीयू क्षमता, व्हेंटिलेटरचे खाटांची माहिती घेण्यात आली.

2) मनुष्यबळाची तपासणी : डॉक्टर, नर्स ,सहाय्यक वैद्यकीय कर्मचारी, आयुष डॉक्टर, फ्रंटलाईन वर्कर, आशा, अंगणवाडी वर्कर यांची उपलब्धता नोंदण्यात आली.

3) रुग्णांची ने-आण करण्यासाठी विविध प्रकारच्या रुग्णवाहिका, (ॲम्बुलन्स) सतर्क करणे. तसेच टेली मेडिसिनची सुविधा चेक करण्यात आली.

4) कोरोना चाचणीसाठी आवश्यक असलेले साधन सुविधा, प्रयोगशाळा, चाचणी किट्स, आरटीपीसीआर, आरएटी किट्सची माहिती घेण्यात आली.

5) लॉजिस्टिक उपलब्धता - अत्यावश्यक औषधे, व्हेंटिलेटर, बीआयपीए, पीपीई किट्स, एन 95 मास्क पुरेसे उपलब्ध करणे.

6) वैद्यकीय साधन सुविधांची माहिती : प्रामुख्याने ऑक्सिजन, सिलेंडर, लिक्विड ऑक्सिजन, ऑक्सिजन स्टोरेज टॅंक, आरोग्य यंत्रणेच्या गॅस पाईप्स

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com