Mumbai Goa Highway Traffic Dainik Gomantak
गोवा

Mumbai Goa Highway Traffic: मुंबई - गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी, पर्यटक अडकले रस्त्यातच

Traffic Jam On Mumbai Goa Highway: सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटक गोवा तसेच कोकणात जात आहेत.

Pramod Yadav

Traffic Jam On Mumbai Goa Highway

रायगड: वर्षाअखेर पर्यटनाचा आस्वाद घेण्यासाठी गोवा आणि कोकणात निघालेल्या पर्यटकांना मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहेत. माणगाव बाजारपेठ परिसरात ही वाहतूक कोंडी झाल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या दोन तासांपासून महामार्गावरील वाहतूक खोळंबली असल्याने, प्रवासी खोळंबले आहेत.

सुट्टयांचा आनंद घेण्यासाठी अनेकजण गोवा आणि कोकणात जात आहेत. नाताळपासून गोव्यात आणि कोकणात जाणाऱ्या पर्यटकांची संख्या कमालीची वाढली आहे. दरम्यान, यामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी होताना दिसत आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबई - गोवा महामार्गावरील वर्दळ वाढल्याने सातत्याने कोंडीची समस्या निर्माण होत आहे. नाताळच्या दिवशी देखील महामार्गावर माणगाव आणि इंदापूर येथे वाहतूक कोंडी झाली होती. त्यानंतर पुन्हा एकदा या परिसरात कोंडीचा सामना प्रवाशांना करावा लागत आहे.

गोव्यात डिसेंबरमध्ये मोठ्या संख्येने पर्यटक दाखल होत असतात. सनबर्न महोत्सव, नाताळ आणि इतर इव्हेंटचा आनंद घेण्यासाठी पर्यटक गोव्याला पसंती देतात. तसेच, शांत आणि निसर्गरम्य कोकण देखील पर्यटकांसाठी पर्वणीचे ठिकाण असते. यावर्षी मोठ्या प्रमाणावर पर्यटक कोकणात दाखल होत आहेत. कोकणात पर्यटकांचा वाढलेला ओघ पाहता महामार्गावर देखील वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे.

दरम्यान, वाहतूक पोलिस सध्या मुंबई - गोवा महामार्गावरील कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT