Panaji Traffic Jam Dainik Gomantak
गोवा

Panaji Traffic Jam: पणजी, पर्वरी, रायबंदर, दिवजा सर्कल येथे प्रचंड वाहतूक कोंडी

दोन्ही बाजुंनी वाहनांच्या रांगा; संथगतीने वाहतूक

Akshay Nirmale

Panaji Traffic Jam: राज्य सरकारने अटल सेतूच्या सर्व लेने सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी अचानक बंद करण्याचा निर्णय घेतल्याने मंगळवारी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला होता. बुधवारी सकाळीही त्याचीच पुनरावृत्ती झाली.

बुधवारी, 5 मार्च रोजी सकाळी पणजीतील दिवजा सर्कल, रायबंदर रोड, पर्वरी रस्त्यावर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

सर्व ठिकाणी वाहनांच्या रांगा लागल्या असून वाहतूक संथ गतीने पुढे सरकत होती. या वाहतूक कोंडीचा फटका नागरीकांसह चाकरमान्यांना बसला. या काळात सर्व कार्यालये सुरू होत असतानाच्या काळातच वाहतूक कोंडीमुळे अनेकांना कार्यालयात पोहचायला उशीर झाला.

दरम्यान, मंगळवारी देखील वाहतूक कोंडी झाली होती. डांबरीकरणाचे काम पूर्ण होईपर्यंत पूल बंद असल्याने चालक, प्रवाशांना कोंडीचा त्रास सहन करावा लागणार आहे. अटल सेतू हा पुढील काही दिवस बंद असल्याने लोकांनी नेहमीच्या वेळेपेक्षा अगोदर घरातून बाहेर पडावे, असे आवाहन प्रशासनाने केले होते.

प्रत्येक जंक्शनच्या ठिकाणी वाहतूक पोलिसांनी एखादे वाहन नादुरुस्त होऊन बंद पडल्यास ते बाजूला करण्यासाठी क्रेन तयार ठेवली आहे. काही ठिकाणी डांबरीकरणाचे काम संथगतीने सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT