CM Pramod Sawant on Government Job: राज्य सरकार पुढील एका वर्षात 2,500 हून अधिक कायमस्वरूपी सरकारी पदांची भरती करणार असल्याची माहिती, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली आहे.
इंग्रजी प्रसारमाध्यमांनी याबाबतचे वृत्त दिले आहे.
मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, राज्य सरकारमध्ये कायमस्वरूपी नियुक्त केलेल्या एकूण कर्मचाऱ्यांची संख्या 20,546 आहे, तर 1,995 कर्मचारी तात्पुरत्या आधारावर कार्यरत आहेत. 2023 आणि 2024 मध्ये अनुक्रमे 600 आणि 500 हून अधिक सरकारी कर्मचारी निवृत्त होतील.
राज्यात बेरोजगारीचे प्रमाण वाढल्याने सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकारने येत्या दोन वर्षांत 20,000 रिक्त पदे निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुख्यमंत्री म्हणाले की, अनुकंपा नियुक्तीसाठी सुमारे 600 अर्ज सरकारकडे प्रलंबित आहेत आणि गेल्या दोन वर्षांत 189 अर्ज मंजूर करण्यात आले आहेत.
उद्योग आणि उपलब्ध टॅलेंट पूल यांच्यातील वाढत्या कौशल्याच्या अंतरामुळे युवकांना रोजगार शोधण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याने, विद्यार्थ्यांना उद्योगासाठी तयार होण्यासाठी राज्य सरकारने अनेक उपाययोजनांची रूपरेषा आखली आहे.
दरम्यान, नुकतेच मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते की सर्व सरकारी भरती कर्मचारी निवड आयोगामार्फत स्पर्धात्मक मार्गाने केली जातील. प्रत्येक नोकरी कमिशन अंतर्गत येईल आणि अर्जदारांसाठी खाजगी क्षेत्रातील अनुभव अनिवार्य असेल असेही त्यांनी म्हटले होते.
2023-24 च्या अर्थसंकल्पात, सावंत यांनी कौशल्य विकास आणि उद्योजकतेसाठी एकूण तरतूद 30 टक्क्यांनी वाढवली आणि गोव्यातील तरुणांना रोजगारक्षम बनवण्यासाठी मदत करण्यासाठी 148.2 कोटी रुपये दिले.
गोवा एज्युकेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (GEDC) मार्फत गोव्यातील तरुणांना सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रासाठी आवश्यक कौशल्ये प्रदान करणे हे मुख्यमंत्री शिकाऊ धोरणाचे उद्दिष्ट आहे, त्यासाठी 5 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.