Ghat pinterest
गोवा

Chorla Ghat: चोर्ला घाटात अवजड वाहतुकीवर बंदी

Goa Chorla: गोव्यात दूध, भाजीपाला वाहतूक करणाऱ्या सहाचाकी वाहनांवरदेखील बंदी घालण्यात आली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

जांबोटी-चोर्ला मार्गावर संततधार पावसामुळे वाहतुकीत व्यत्यय येत आहे. येथील नदी-नाल्यांवर असलेले पूल जीर्ण झाले असल्याने बेळगावातून जांबोटी-चोर्लामार्गे गोव्याकडे जाणाऱ्या अवजड वाहनांना खानापूरमार्गे वळविण्यात आले आहे; तर चोर्ला घाटातील अवजड वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे.

केवळ चारचाकी वाहनांना चोर्लामार्गे गोव्याकडे जाण्याची परवानगी देण्यात आली असून, सहाचाकी आणि त्यापुढील वाहनांना चोर्लाऐवजी अनमोड घाटमार्गे जाण्याची सूचना केली आहे. चोर्ला मार्गावरून गोव्यात दूध, भाजीपाला वाहतूक करणाऱ्या सहाचाकी वाहनांवरदेखील बंदी घालण्यात आली आहे.

चोर्ला मार्गावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आल्यानंतर बेळगाव शहर पोलिसांनी पिरनवाडी येथे बॅरिकेड्‍स उभारले आहेत. या ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून, अवजड वाहनांना पुढे जाण्यास मज्जाव केला जात आहे. चोर्लामार्गे गोव्याकडे जाण्यासाठी येणाऱ्या वाहनचालकांना रस्ता बंद असल्याची माहिती देऊन खानापूर येथून अनमोडमार्गे गोव्याकडे वळविले जात आहे. एकही अवजड वाहन चोर्लामार्गे गोव्याकडे पाठविले जाऊ नये, अशी सक्त सूचना करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nithya Menen At IFFI: 'तरीही त्या व्यक्तीसोबत काम करणे कर्तव्यच'; अभिनेत्री नित्या मेनन सहकलाकारांबद्दल नेमके काय म्हणाली..

IFFI 2024: ‘ट्रेन’ संकल्पनेतून भारतीय सिनेमाची ‘सफर’! कॅमेऱ्याच्या प्रवेशद्वाराचे विशेष आकर्षण

Manoj Bajpayee At IFFI: 'वेळेत पूर्णविराम आणि संवादात मौन हवे'; मनोज वाजपेयीने सांगितले अभिनेत्यांबाबतीत दोन टप्पे

Indian Navy Goa: गोव्यात नौदलाच्या जहाजाचा अपघात; मच्छिमारांच्या बोटीला धडक, दोन बेपत्ता, 11 जाणांना वाचविण्यात यश

IFFI 2024: इफ्फीच्या पहिल्या दिवशी ‘All We Imagine As Light’ ची चर्चा! छाया कदम, कानी कसूरती, दिव्या प्रभा यांचा सशक्त अभिनय

SCROLL FOR NEXT