Goa Monsoon Update Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon Update: शुक्रवारी, शनिवारी गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता

आज राज्यातील अनेक भागांत हलक्या ते मध्यम सरी पडल्या.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Monsoon Update: गोव्यात शुक्रवारी आणि शनिवारी (दि. 30 / 01) तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. वादळी वाऱ्यासह उत्तर आणि दक्षिण गोव्यातील काही भागात मुसळधार पाऊस पडेल अशी शक्यता गोवा हवामान खात्याने वर्तवली आहे. मागील दिवसांत गोव्यात काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली आहे.

आज राज्यातील अनेक भागांत हलक्या ते मध्यम सरी पडल्या. कोणकोण, सांगे, मुरगाव, दबोळी, केपे आणि पेडणे परिसरात पावसाची नोंद झाली.

गोवा हवामान खात्याने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, आज (दि.30 सप्टेंबर) आणि उद्या (दि.01 ऑक्टोबर) रोजी गोव्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडेल. तसेच 02, 03 आणि 04 ऑक्टोबर रोजी देखील काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळतील. किनारपट्टी भागात 75 कि.मी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे असे हवामान खात्याने म्हटले आहे.

परतीचा मान्सून (Monsoon Return Journey) एक आठवड्यापासून लांबणीवर पडला आहे. देशातून पंजाब, दिल्ली, हिमाचल प्रदेश, पश्चिम उत्तर प्रदेश, हरियाना, चंडीगडसह वायव्य भारतातील बहुतांशी भागातून मॉन्सून परतला आहे. आज कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि पूर्व विदर्भातील अनेक भागांत हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी पडल्या. कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी पावसाच्या सरी पडल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Land Grabbing Case: गोव्यातील भू-माफियांना ईडीचा दणका! बनावट कागदपत्रे बनवून जमीन हडपणाऱ्यांची 6.27 कोटींची मालमत्ता जप्त

Viral Video: रील बनवणाऱ्या मॉडेलचा तमाशा! भररस्त्यात एकाला झोडपलं, सोशल मीडियावर उठली टीकेची झोड; काय घडलं नेमकं?

Iran US Israel War: ''इराण कधीही सरेंडर करु शकतो'', डोनाल्ड ट्रम्प यांचा G7 बैठकीत मोठा दावा; मध्यपूर्वेतील युद्धाला नवं वळण

Gyanesh Kumar: केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरुद्ध विरोधकांचं 'महाभियोग' अस्त्र; 193 खासदारांच्या स्वाक्षरीसह संसदेत नोटीस दाखल

Panaji Municipal Election Result 2026: पणजी महानगरपालिकेवर भाजप-बाबूश पॅनेलचं निर्विवाद वर्चस्व, उत्पल पर्रीकरांच्या पॅनेलचा धुव्वा; विजयी उमेदवारांची संपूर्ण लिस्ट

SCROLL FOR NEXT