Goa Monsoon Update Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon Updates: राज्यात तीन दिवस जोरदार वादळाची शक्यता

कोकण विभाग आणि गोव्यात येत्या पाच दिवसांत सर्वत्र पाऊस पडण्याची शक्यता आहे

दैनिक गोमन्तक

पणजी: पावसाचा जोर ओसरला असला तरी आज, गुरुवारपासून पुढील दोन दिवस गोवा (Goa) आणि महाराष्ट्राच्या (Maharashtra) किनारी भागात वादळी वारे (storm) वाहतील, असा अंदाज हवामान वेधशाळेने (IMD Goa) व्यक्त केला आहे. या काळात किनाऱ्यापासून 75 कि.मी.पर्यंत धोका असल्याचे म्हटले आहे. (Heavy storm expected in Goa for three days)

गेल्या दोन दिवसांपासून पावसाने दिलासा दिला आहे. बुधवारी राज्यात केवळ 11.7 मि.मी. पावसाची नोंद झाली. गेल्‍या आठवड्यात सरासरीच्या तुलनेत 27 टक्‍के पावसाची नोंद झाली होती. ती आता घटून 18 टक्क्यांवर आली आहे. म्हापसा, वाळपई, साखळी, सत्तरी आणि केपे परिसरात नेहमीप्रमाणेच पावसाची रिपरिप कायम होती. गुरुवारपासून राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान कोकण विभाग आणि गोव्यात येत्या पाच दिवसांत सर्वत्र पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने (IMD) मंगळवारी व्यक्त केली. येत्या तीन दिवसात कोकण आणि गोव्याच्या दुर्गम भागात पावसाच्या जोरदार हालचाली होऊ शकतात. 30 आणि 31 जुलै रोजी मुसळधार ते अती मुसळधार पाऊस होणार म्हणून राज्यात ऑरेंड अलर्टटा इशाराही देण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा एकदम दणक्यात! सरकारकडून महागाई भत्त्यात 'इतक्या' टक्क्यांची घसघशीत वाढ; मिळालं तगडं गिफ्ट

Kumar Kushagra Century: भारतीय फलंदाजीचा नवा हुकमी एक्का! 21 वर्षाच्या पोरानं ठोकलं शानदार शतक, कांगारुंची काढली पिसं; सिलेक्टर्सचं वेधलं लक्ष

श्रीलंकन कोर्टाचा मोठा निकाल! ईस्टर साखळी बॉम्बस्फोटातील 15 दोषींना सुनावली प्रत्येकी 220 वर्षांची शिक्षा; 11 भारतीयांसह 270 बळींना न्याय

Ranji Trophy: गोव्याचा स्वप्नील अस्नोडकर आता केरळचा मुख्य प्रशिक्षक! रणजीसह वनडे-टी-20 संघाचीही जबाबदारी; 2026-27मोसमासाठी मोठी संधी

Vagator Turtle Protection: वागातोर किनाऱ्यावर कासवांची 24 तास निगराणी! ऑलिव्ह रिडलेच्या अंड्यांच्या संरक्षणासाठी वन विभागाची कडक गस्त

SCROLL FOR NEXT