Goa Monsoon Updates: राज्यात पावसाचा जोर ओसरला

पणजी शहरासह पेडणे, साखळी, मुरगाव येथे पावसाची रिपरिप दिवसभर कायम राहिली. पुढील दोन दिवस राज्यात अशीच स्थिती राहील, असे हवामान वेधशाळेने म्हटले आहे.
Goa Monsoon Update
Goa Monsoon UpdateDainik Gomantak

पणजीः राज्यात पावसाचा (Goa Monsoon Updates) जोर ओसारल्याने गोमंतकीयाना दिलासा मिळाला आहे. गत तीन रविवारी अतिवृष्टीमुळे नागरिकांना सुट्टीच्या दिवशी घराबाहेर पडता आले नव्हते. 11 जुलैपासून राज्यात धुवाधार पाऊस कोसळत होता. परिणामी, अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली. त्यात राज्यात मोठी वित्तहानीही झालेली आहे. अशा स्थितीत रविवारी दिवसभर पावसाने उसंत घेतली. 24 तासांत केवळ 15.5 मिमी पावसाची नोंद झाली. पणजी शहरासह पेडणे, साखळी, मुरगाव येथे पावसाची रिपरिप दिवसभर कायम राहिली. पुढील दोन दिवस राज्यात अशीच स्थिती राहील, असे हवामान वेधशाळेने म्हटले आहे. (24Hrs Rainfall 15 5 millimetres on 25th JULY 2021 in Goa)

Goa Monsoon Update
Goa : ‘ओपा’तून आज पाणीपुरवठा

वरुणराजाची कृपा झाल्याने पूर ओसरला खरा, मात्र आता पूरग्रस्तांसमोर नानाविध समस्या उभ्या राहिल्या आहेत. घरादारांतील चिखल साफ करता, करता पूरग्रस्तांसमोर आता सापांचेही संकट निर्माण झाले आहे. पुराच्या पाण्यात वाहून आलेल्या साप-जिवाणूनी काही घरांनी आसरा घेतला आहे. चिखल आणि घाणीमुळे रोगराई फैलावण्याची भिती वाढली आहे. दरम्यान, पूर ओसरला असला, तरी परिस्थिती पूर्वपदावर येण्यास आणखी काही दिवस लागण्याची शक्यता आहे.

Goa Monsoon Update
Goa Flood: पुरग्रस्तांना आरोग्यमंत्री राणेंचा मदीतीचा हात

राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे शेतीमध्ये पाणीच पाणी झाले असून भातशेती, फळभाज्यांच्या पिकांना जोरदार फटका बसला आहे. राज्यातील विविध भागांत लागवड केलेल्या भातशेती, फळभाज्यांचे पीक भुईसपाट झाले असून अनेक ठिकाणी पाणी साचल्याने कृषी विभागाला पाहणी करून पंचनामे करण्यास शक्य होत नाही. राज्यात 832 हेक्टर शेतजमिनी तसेच बागायतीना पावसाचा मार बसला असून 2 कोटी 55 लाख रुपये पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज कृषी विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com