Goa Monsoon Update Dainik Gomantak
गोवा

Goa Rain Update: मागील दहा वर्षांतील सर्वाधिक चौथ्या क्रमांकाचा पाऊस! वाळपईत द्विशतक होणार का?

Goa Weather Update: यंदाच्या ऑगस्ट महिन्यात राज्यात एकूण ९७० मि.मी. म्हणजे ३८.१८ इंच पाऊस बरसला, जो सरासरीच्या तुलनेत ३३ टक्के अधिक आहे

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: राज्यात यंदा पाऊस नव-नवे विक्रम करत आहे. वाळपई केंद्रात तर आत्तापर्यंत पावसाने ५ हजार मिलिमीटरचा (१९७.२१ इंच) टप्पा ओलांडला आहे. लवकरच तेथे पाऊस इंचांचे द्विशतक गाठू शकतो.

पावसाळी हंगामाचा एक महिना अजून बाकी आहे. तरीसुद्धा वाळपईत ऑगस्टमध्येच ५ हजार मि.मी. पावसाची नोंद होणे ही महत्त्वाची घटना असल्याचे एनआयओचे निवृत्त शास्त्रज्ञ एम. आर. रमेशकुमार यांनी सांगितले. दरम्यान, यंदाच्या ऑगस्ट महिन्यात राज्यात एकूण ९७० मि.मी. म्हणजे ३८.१८ इंच पाऊस बरसला, जो सरासरीच्या तुलनेत ३३ टक्के अधिक आहे.

यंदाच्या ऑगस्टमध्ये पडलेला पाऊस हा मागील दहा वर्षांतील ऑगस्टमधील सर्वाधिक चौथ्या क्रमांकाचा पाऊस आहे. आतापर्यंत राज्यात एकूण ३९२३.९ म्हणजेच १५४.४८ इंच एवढ्या पावसाची नोंद करण्यात आली आहे, जी सरासरी पावसाच्या तुलनेत तब्बल ४५.९ टक्के अधिक आहे.

आतापर्यंतचा एकूण पाऊस

वाळपई १९७ इंच

सांगे १८८ इंच

साखळी १६८ इंच

केपे १६७ इंच

पेडणे १६२ इंच

जुने गोवा १५२ इंच

फोंडा १५० इंच

काणकोण १४९ इंच

पणजी १४५ इंच

मडगाव १४४ इंच

म्हापसा १४२ इंच

मुरगाव १३५ इंच

दाबोळी १२१ इंच

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT