Goa Rain Update: वैज्ञानिकही आश्‍चर्यचकीत! सरासरीपेक्षा ४५.८ टक्के अधिक पाऊस; जुलैत १२४ वर्षांतील रेकॉर्ड ब्रेक

Goa Monsoon Update: वाळपई, सांगे, साखळी, केपे, पेडणे येथे १५० इंचांहून अधिक; दाबोळीत सर्वांत कमी ११७.९८ इंच पावसाची नोंद
Goa Monsoon Update: वाळपई, सांगे, साखळी, केपे, पेडणे येथे १५० इंचांहून अधिक; दाबोळीत सर्वांत कमी ११७.९८ इंच पावसाची नोंद
Goa Weather UpdateCanva
Published on
Updated on

पणजी: यंदाचा पाऊस अतिशय निराळा आणि नवनवे विक्रम करणारा ठरत आहे. यंदा ४ जून रोजी राज्‍यात मॉन्सूनला सुरवात झाल्यापासून आतापर्यंत एकूण ३८११.८ मिमी म्हणजेच तब्बल १५०.७० इंच इतक्या पावसाची नोंद करण्यात आली.

सर्वसामान्यपणे राज्यात संपूर्ण मॉन्सूनमध्ये १२० इंच पाऊस झाला की, सरासरी पावसाची पातळी गाठली, असे समजले जाते; परंतु सरासरी पावसाच्या तुलनेत आतापर्यंत तब्बल ४५.८ टक्के अधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे. यंदा पावसाने राज्यात नवनवीन विक्रम केले आहेत. जूनमध्ये राज्यात सरासरी पावसाच्या तुलनेत अधिक पाऊस लागला आहे.

तर जुलै महिन्यात तब्बल ८३.६३ इंच पाऊस बरसला, जो हवामान विभागाकडे असलेल्या मागील १२४ वर्षांच्या आकडेवारीच्या तुलनेत सर्वाधिक पाऊस आहे. ७ जुलै रोजी तब्बल ९.२९ इंच पाऊस पडला, जो एकाच दिवशी सर्वाधिक पाऊस पडलेल्या नोंदीत आतापर्यंतचा सर्वाधिक दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस आहे. ७ जुलै रोजी पणजीत तब्बल १४ इंच पावसाची नोंद झाली. हा पणजीत आतापर्यंत एकाच दिवशी पडलेला सर्वाधिक पाऊस आहे.

Goa Monsoon Update: वाळपई, सांगे, साखळी, केपे, पेडणे येथे १५० इंचांहून अधिक; दाबोळीत सर्वांत कमी ११७.९८ इंच पावसाची नोंद
Goa Rain Update: आज ऑरेंज अलर्ट! जोरदार पावसाची शक्यता; गेल्या २४ तासांत ७६ मिमी पाऊस

दाबोळीत सर्वांत कमी पाऊस

राज्यात आतापर्यंत सर्वाधिक ४,८२३.१ मिमी म्हणजेच १८९.८८ इंच इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. वाळपई, सांगे, साखळी, केपे, पेडणे येथे १५० इंचांहून अधिक पावसाची नोंद झाली असून सर्वांत कमी २९९६.९ मिमी म्हणजेच ११७.९८ इंच पावसाची नोंद दाबोळी येथे केली आहे.

अवघ्या तीन महिन्यांत १५० इंच पाऊस पडण्याची ही पहिलीच घटना आहे. मी तर यंदा गोव्यात बंपर पाऊस पडला, असे मानतो. कदाचित यंदाचा पाऊस हा आतापर्यंतचा सर्वाधिक पाऊस ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

डॉ. एम. आर. रमेशकुमार, निवृत्त शास्त्रज्ञ, एनआयओ

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com