Goa Monsoon Orange Alert Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon 2023: परतीच्या पावसाचा दणका; ऑरेंज अलर्ट जारी

जनजीवन विस्कळीत: अनेक ठिकाणी पडझड; आज मुसळधार शक्य

दैनिक गोमन्तक

Heavy Rainfall In Goa Orange Alert Issue: बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा आणि अरबी समुद्रातील ऑफ शोर ट्रफ्स यांमुळे नैऋत्य मॉन्सून परतीच्या पावसाने आज राज्याला झोडपले. संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले.

अनेक ठिकाणी झाडे पडल्याने वाहतूक खोळंबली, तर घरांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र, कोणतीही मोठी दुर्घटना घडली नसल्याची माहिती अग्निशमन आणि आपत्कालीन व्यवस्थापनाने दिली. गेल्या २४ तासांत सप्टेंबर महिन्यातील विक्रमी ८०.३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

पावसाळी हंगामाच्या अखेरच्या महिन्यात म्हणजेच सप्टेंबरमध्ये चतुर्थीपासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असून शुक्रवारी सकाळपासून पडणाऱ्या संततधार पावसाने राज्याला झोडपून काढले.

दक्षिणेकडील पूर्वमध्य अरबी समुद्रात तसेच पूर्वमध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असल्याने कोकण-गोवा किनारपट्टीत रविवारी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

सतर्कतेचा इशारा

शनिवारी राज्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याच्या वेधशाळेने वर्तविली असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहनही केले आहे. राज्यात शनिवारी (३०) ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

राज्यात मागील २४ तासांत २.३७ इंच पावसाची नोंद झाली असून आतापर्यंत राज्यात एकूण १२८.९ इंच पावसाची नोंद झाली आहे.

राजधानीतील रस्ते पाण्याखाली

शुक्रवारी जोरदार पावसामुळे राजधानी पणजीतील रस्ते पाण्याखाली गेले. शहरातील सखल भागात पाणी साचले होते. वादळी वारा आणि जोरदार पावसामुळे दृश्‍यमानता कमी झाल्याने दुचाकी तसेच चारचाकी चालकांना वाहने सावकाश चालवावी लागत होती.

वास्कोत एमपीटी इस्पितळाजवळ वाहिन्यांवर झाड कोसळल्यामुळे बराच वेळ वीज गुल झाली होती. वाहतूकही ठप्प झाली. शनिवारी पावसाचा जोर वाढणार असून जोरात वारे वाहण्याची शक्यता आहे. मागील चोवीस तासांत सर्वाधिक पावसाची नोंद दाबोळीत झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

Raj - Uddhav Thackeray: मुंबईत दुमदुमला 'आवाज मराठी'चा; 20 वर्षानंतर राज - उद्धव एकत्र

"हॉटेलचं जेवण चाखल्यावर घरचं आवडेल का?" प्रेमानंद महाराजांनी सांगितलं तरुणांच्या घटस्फोटांचं मुख्य कारण; Watch Video

Crime News: लाकडाच्या भुशात दारु लपवली, कर्नाटकच्या गाडीला गोव्याची नंबरप्लेट लावली; केरी नाक्यावर 12 लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

Goa News Live Updates: झाड पडलेल्या घराची वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांनी केली पाहणी

SCROLL FOR NEXT