Goa Valvanti River Flood  Dainik Gomantak
गोवा

Valvanti Flood: वाळवंटीला पुन्हा पूर! डोंगरमाथ्यावर जोरदार वृष्टी

Goa Flood: नदीची पातळी दुपारी ३.५ मीटरपर्यंत पोहोचली होती, तर बाजारातील नाल्याची पातळी ३.९ मीटर इतकी झाली होती

गोमन्तक डिजिटल टीम

Valvanti River Flood

साखळी: गेले काही दिवस उसंत घेतलेल्या पावसाने पुन्‍हा एकदा राज्‍याला झोडपून काढले. त्‍यामुळे येथील वाळवंटी नदी परिसरात आज शनिवारी लगेच पूरस्थिती निर्माण झाली. बाजारातील नाल्यात साचणारे पाणी पंपिंग करून बाहेर काढण्‍याची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे.

नदीची पातळी दुपारी ३.५ मीटरपर्यंत पोहोचली होती, तर बाजारातील नाल्याची पातळी ३.९ मीटर इतकी झाली होती. दुपारी नदीला भरती असल्याने पाणी झपाट्याने वाढत होते.

आज दुपारी नदीला भरती असल्याने पाणी झपाट्याने वाढू लागले. विर्डी-महाराष्ट्र, केरी-सत्तरीच्या डोंगर भागात जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे साखळीतील वाळवंटी नदीला बरेच पाणी आले आहे. दुपारनंतर भरती ओसरू लागल्यावर नदीच्‍या पाण्‍याची पातळी हळूहळू कमी होत गेली. संध्याकाळपर्यंत स्‍थिती नियंत्रणात आली होती.

गेले काही दिवस पावसाने उसंत घेतली होती. कडक उन्हाचा सामना लोकांना करावा लागला होता. त्‍यामुळे उकाडा वाढला होता. मात्र गेल्या दोन दिवसांपासून पावसाने पुन्‍हा हजेरी लावल्याने हवेत पुन्हा गारवा निर्माण झाला आहे.

१ ऑगस्‍टच्‍या पुराच्‍या आठवणी झाल्‍या ताज्‍या

गेल्या १ ऑगस्ट रोजी मुसळधार व सततपणे पडणाऱ्या पावसामुळे साखळीत पूर आला होता. काजीवाडा, बंदिरवाडा, विठ्ठलापूर या भागात घरांमध्ये पाणी घुसले होते. तर, एका घरामध्ये तीन व्यक्ती अडकूनही पडल्या होत्या. या पुरामुळे अनेकांचे नुकसान झाले होते. काजीवाडा येथे दोन चारचाकी गाड्या पाण्याखाली गेल्या होत्या. त्या दिवशी संध्याकाळपर्यंत पुराचे पाणी ओसरले होते. त्यानंतर पाऊस भरपूर पडला, पण पूरस्थिती निर्माण झाली नव्हती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Live News: फोंड्यात बाल विवाहाचा प्रकार उघडकीस

Goa Crime: टॅक्सीचालकाने केले अल्पवयीन मुलीशी लग्न; घरी गेल्यावर उलगडला खरा प्रकार, कर्नाटकातील तरुणाच्या आवळल्या मुसक्या

'ही धूळफेक ठरू नये...'; निवड आयोगाकडून भरतीच्या निर्णयावर चोडणकर, बोरकरांनी सुनावले खडे बोल

C K Nayudu Trophy: गोव्यावर फॉलोऑनची नामुष्की! अझान, देवनकुमारची शतकी सलामी

'सहकार क्षेत्रातील बँकांनी तयार रहावे..'; एनपीए वाढ, डबघाईवरुन मंंत्री शिरोडकरांनी दिला कडक इशारा

SCROLL FOR NEXT