Mapusa Tree Collapse on House  Dainik Gomantak
गोवा

Mapusa News: झाड पडल्याने मोडला ‘संसार’

गोमन्तक डिजिटल टीम

म्हापसा: राज्यात पावसाचा मारा सुरू असून, सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झालेल्या पडझडीत बुधवारी, बार्देशात तिघेजण जखमी झाले. यामध्ये, म्हापशात दोन वयस्कर महिला, तर मायणा-सडये-शिवोलीत एकजण बालबाल बचावला.

खोर्ली-सीम, म्हापसा येथील साळगावकर कुटुंबीयांच्या घरावर बुधवारी दुपारी ३.३०च्या सुमारास घराशेजारील भलेमोठे झाड सोसाट्याच्या वाऱ्यामुळे कोसळले. हे झाड कौलारू घरावर पडल्याने, घरातील साहित्यांची नासधूस झाली.

तसेच घरातील दोन वयस्कर महिला जखमी झाल्या. प्रभावती (८०) व रेशा (६०) असे जखमींचे नावे आहेत. त्यांना उपचारार्थ जिल्हा इस्पितळात दाखल केले. यात पीडित कुटुंबीयांची लाख रुपयांची हानी झाली.

मायणा-सडये, शिवोली येथे महेश कळंगुटकर यांच्या पत्र्यांच्या घरावर दोन झाडे कोसळली. परिणामी क्राँकीटचा बीम बेडरुममध्ये पडला, जिथे कळंगुटकर हे झोपले होते. तर त्यांची पत्नी घराबाहेर होती. तर मुले शाळेला गेलेली महेश यांच्या पायाला दुखापत झाली. ही घटना बुधवारी सकाळी ११च्या सुमारास घडली.

१२ आपत्कालीन कॉल्स

म्हापसा मार्केटच्या मागील जेस्मिन इमारतीच्या छतावरील पत्र वादळी वाऱ्यामुळे उखडून बाजारपेठेत कोसळले. म्हापसा अग्निशमन दलाला बुधवारी १२ आपत्कालीन कॉल्स आहे. घरावर किंवा संरक्षक भिंतीवर झाडे कोसळल्याने लोकांचे आर्थिक नुकसान झाले

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: गोवा काँग्रेसच्या प्रभारी सचिवांचा बैठकांचा धडाका; 'त्या' आमदारांना प्रश्न विचारण्याचे आवाहन

Sunburn Festival 2024: त्यांनी कॅप्टनसारखे वागावे, बिनबुडाची विधाने करू नये; ‘सनबर्न’ याचिकेवरुन खंवटेंचे प्रत्त्युत्तर

Goa Live Updates: कुळण-सर्वण येथे विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू

Bhoma Highway: 'भोम प्रकल्प' गोव्याच्या विकासातील महत्त्वाचा टप्पा! भाजपने मानले गडकरींचे आभार

Goa Traffic Department: सावधान! गोव्यात येताय? आता हेल्मेट नसल्यावर होणार 'ही' कारवाई

SCROLL FOR NEXT