vasco Rain News Dainik Gomantak
गोवा

Rain News: वास्को परिसरात पावसाची जोरदार हजेरी

अचानक सुरु झालेल्या पावसाने उडाली नागरिकांची तारांबळ

दैनिक गोमन्तक

वास्को: वास्कोत आज पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक पडलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले.

(Heavy rain in vasco goa area)

आठवडाभराच्या विश्रांतीनंतर आज पावसाने सायंकाळी 5 वाजल्यापासून जोर धरला. त्यामुळे लोकांची तारांबळ उडाली. सुमारे दोन तास पडलेल्या पावसामुळे रस्ते पाण्याखाली गेले होते. तसेच कार्यालयातील कर्मचाऱ्यांना पाऊस थांबेपर्यंत वाट बघत राहावे लागले.

काही नागरिकांना भिजत जाण्याची वेळ आली, तर काही ना संध्याकाळी सात वाजेपर्यंत एका ठिकाणी पाऊस जाण्याची वाट बघत रहावे लागले. जोरदार पावसाने वास्कोतील स्वतंत्र पथ मार्ग संपूर्ण पाण्याखाली गेला होता. तसेच वाहने पाण्यात उभी करून काहींना आसरा घ्यावा लागला. जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची बरीच तारांबळ उडाल्याचे चित्र सर्वत्र दिसत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मुरगाव, वास्कोत वीज बिलांचा शॉक! वाढीव बिलांमुळे संतप्त नागरिकांनी अभियंत्याला घेतलं फैलावर; विद्युत भवनात राडा

Goa Fraud Case: चार्ल्स शोभराजचा ‘चेला’ अखेर गजाआड! 35 वर्षांत 300 पंचतारांकित हॉटेल्‍सना गंडा; गोव्यातही राहून गेला महाठग

अरब व्यापाऱ्यांनी भारतात आणले आणि इथेच स्थिरावले, 'गोरखचिंचे'च्या प्रवासाची रंजक कहाणी

Goa Kala Academy: कला अकादमी, 'क्या पाया क्या खोया?'

Goa Police Seniority Dispute Case: नव्या फॉर्म्युल्याने सुटला गोवा पोलिसांच्या पदोन्नतीचा पेच! गोवा खंडपीठाचा सर्वात मोठा आणि व्यावहारिक तोडगा

SCROLL FOR NEXT