CM Pramod Sawant : गोव्यातील ड्रग्‍जविक्री, गुन्हेगारी मोडून काढण्‍यासाठी प्रयत्‍नशील

पर्यटनस्थळाबरोबरच गोवा हे ड्रग्सविक्री केंद्र म्हणून नावारुपास आल्याने सरकारने ड्रग्‍सचा व्यवसायच मोडून काढण्यास ठोस पावले उचलली आहेत.
Goa CM Pramod-Sawant
Goa CM Pramod-SawantDainik Gomantak
Published on
Updated on

CM Pramod Sawant : पर्यटनस्थळाबरोबरच गोवा हे ड्रग्सविक्री केंद्र म्हणून नावारुपास आल्याने सरकारने ड्रग्‍सचा व्यवसायच मोडून काढण्यास ठोस पावले उचलली आहेत. राज्यातील वाढती गुन्हेगारी व ड्रग्‍सविक्रीचा सुळसुळाट, यामुळे गोव्याचे नाव बदनाम होऊ लागल्याने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्याची गंभीर दखल घेत आज बुधवारी पोलिस मुख्यालयात पोलिस उपअधीक्षक पदावरील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन ड्रग्स व्यवसायाचा नायनाट करण्याच्‍या सूचना केल्‍या.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्ण कोलमडल्याचे दिसून येत आहे. तसेच हैदराबाद पोलिसांनीही गोवा पोलिसांवर ड्रग्‍सबाबत टीका केल्याने ड्रग्‍सविक्रीची पार्श्‍वभूमी असलेल्या तिघा दलालांना पोलिसांनी ताब्‍यात घेतले असून त्यांना किमान एक वर्ष बंदिस्त कोठडीत ठेवण्यात येणार आहे.

पोलिस मुख्यालयातील बैठकीनंतर बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, गेल्या काही दिवसांत चोऱ्यामाऱ्या, खून , खुनाचा प्रयत्न, दरोडे यासारख्या गुन्‍ह्यांत वाढ झाली असली तरी गोवा पोलिसांचे तपासकाम करण्याचे प्रमाणही देशात सर्वाधिक आहे.

Goa CM Pramod-Sawant
Sonali Phogat Case : एडविन नुनिस यास सशर्त जामीन

राज्यातील ड्रग्जचा नायनाट करण्यासाठी या व्यवसायात गुंतलेल्या व तस्करीप्रकरणी कारवाई झालेल्या जुआंव लोपीस, आवेलिनो डिसोझा (कळंगुट) व वेली डिकॉस्‍टा (केपे) या तिघांना ‘पीट-एनडीपीएस’ कायद्याखाली ताब्यात घेण्यात आले आहे. या तिघांना येत्या काही दिवसांत सल्लागार मंडळासमोर उभे करून अधिकाधिक कोठडीत ठेवण्यासाठी या मंडळासमोर सरकारतर्फे बाजू मांडण्यात येणार आहे.

दरम्यान सोनाली फोगट मृत्यू प्रकरणावेळी ड्रग्‍सप्रकरणी ॲडविन नुनीस याला अटक झाल्यावर हैदराबाद पोलिसांकडून गोवा पोलिसांवर आरोप करण्‍यात आले होते. त्‍यास गोवा पोलिस महासंचालक जसपाल सिंग यांनी ईमेलद्वारे चोख उत्तर दिले आहे. त्यावर हैदराबाद पोलिस आयुक्तांकडून अजून काही प्रजिक्रिया आलेली नाही. त्यामुळे त्यांचे हे आरोप अनावश्‍यक होते हे स्पष्ट होते. गोवा हे ड्रग्‍सविक्रीचे केंद्र नव्हे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी खडसावले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

home minister amit shah reviews goa st reservation file
mormugao port goa coal import cargo handling capacity
diksha parwadkar accident
dabolim selected model solar village goa pm surya ghar yojana chicalim panchayat geda grant rajeev samant
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com