मडगाव: मुसळधार पावसाने बुधवारी मडगाव शहराला झोडपून काढले. गांधी मार्केटमध्ये पाणी शिरले त्यामुळे तेथील व्यापारांचेही नुकसान झाले.
पावसाने जोर धरल्याने व मार्केटात पाणी शिरल्याने येथील व्यापाऱ्यांचे हाल झाले. मार्केटमध्ये आलेल्यांनाही या पाण्याचा त्रास सहन करावा लागला. त्याच स्थितीत त्यांना बाजारहाट करावी लागली. तसेच या भागातील काही घरांमध्ये गुडघाभर पाणी शिरल्याने त्या लोकांचे अतोनात हाल झाले.
माजी नगराध्यक्ष राजेंद्र आजगावकर यांनी या सर्व घटनेला मडगाव पालिकेला जबाबदार धरताना, मान्सूनपूर्व कामे केली नाहीत, गटार उपसणी व अन्य कामांसाठी पालिकेने कामगार पुरविले नसल्याने आज हा प्रसंग ओढावल्याचा आरोप केला.
दरम्यान, पालिका नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी हे आरोप फेटाळून लावले आहे. आम्ही या मार्केट परिसरावर नेहमीच लक्ष ठेवून असतो. तेथे कामासांठी कामगारही पुरविले असल्याचे ते म्हणाले.
आजगावकर यांनी आम्ही पुन्हा एकदा मडगावचे आमदार दिगंबर कामत यांच्याकडे जाऊन आमची कैफियत मांडणार असल्याचे स्पष्ट केले. भविष्यात अशीच परिस्थिती राहिल्यास हे मार्केट बुडून जाईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
तुरळक पडझड
मडगावात बुधवारी पाऊस दिवसभर सुरू होता. पावसाबरोबर वाराही असल्याने अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली. मात्र मोठ्या घटना घडल्या नाहीत, अशी माहिती मडगाव अग्निशामक दलाच्या कार्यालयातून देण्यात आली.
पावसामुळे अनेकांनी चारचाकी वाहने रस्त्यावर काढली होती. त्यामुळे वाहतूक खोळंबून राहण्याच्या घटनाही घडल्या. वाहतूक पोलिस वाहतूक स्थितीवर लक्ष ठेवून होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.