Goa Waste Management: राज्‍यात दरदिवशी जमतो 150 टन प्‍लास्‍टिक कचरा; जनजागृतीनंतरही पिशव्‍या, बाटल्‍यांचे प्रमाण अधिक

Plastic Waste: राज्‍यातील साळगाव आणि काकोडा या दोन कचरा प्रक्रिया प्रकल्‍पांमध्‍ये दररोज सुमारे ३०० टन कचरा येतो. त्‍यात प्‍लास्‍टिक पिशव्‍या, बाटल्‍या असा मिळून सुमारे १५० टन प्‍लास्‍टिक कचरा असतो.
Goa Waste Management
Goa Waste ManagementDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्‍यातील साळगाव आणि काकोडा या दोन कचरा प्रक्रिया प्रकल्‍पांमध्‍ये दररोज सुमारे ३०० टन कचरा येतो. त्‍यात प्‍लास्‍टिक पिशव्‍या, बाटल्‍या असा मिळून सुमारे १५० टन प्‍लास्‍टिक कचरा असतो, अशी माहिती कचरा व्‍यवस्‍थापन महामंडळाच्‍या वरिष्‍ठ अधिकाऱ्यांनी बुधवारी ‘गोमन्तक’शी बोलताना दिली.

राज्‍याच्‍या लोकसंख्‍येसह उद्योगांमध्‍येही गेल्‍या काही वर्षांपासून सातत्‍याने वाढ होत आहे. त्‍यानुसार दरवर्षी सुक्‍या आणि ओल्‍या कचऱ्यातही वाढ होत चालली आहे. दोन्‍ही प्रकारच्‍या कचऱ्‍यावर उत्तर गोव्‍यातील साळगाव आणि दक्षिण गोव्‍यातील काकोडा कचरा प्रक्रिया प्रकल्‍पामध्‍ये प्रक्रिया करून त्‍यापासून सिमेंट आणि विजेची निर्मिती केली जात असल्‍याचेही या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Goa Waste Management
Goa Politics: पक्षशिस्त मोडल्यास 'डायरेक्ट अ‍ॅक्शन', दामू नाईकांचा आर्लेकर-आजगावकर यांना इशारा; म्हणाले, "सांगणार नाही, थेट कारवाईच करणार"

दरम्‍यान, राज्‍यात प्‍लास्‍टिक कचऱ्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात वाढ होत चालली आहे. त्‍यात बहुतांशी लोक अजूनही प्‍लास्‍टिक पिशव्‍यांचाच वापर करीत असल्‍याने कॅन्‍सरसारख्‍या आजारांचा विळखा वाढत असतानाही राज्‍य सरकार याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्‍याच्‍या तक्रारी प्‍लास्‍टिकविरोधी चळवळीत सहभागी असलेल्‍या अनेकांकडून करण्‍यात येत आहेत.

प्‍लास्‍टिकला पर्याय म्‍हणून नागरिक जोपर्यंत कापडी पिशव्‍या वापरत नाहीत, तोपर्यंत जनतेतील आजारांचा विळखा वाढत राहील. शिवाय गोव्‍याच्‍या निसर्गाचा ऱ्हास होतच राहील, अशा प्रतिक्रियाही त्‍यांच्‍याकडून उमटत आहेत.

Goa Waste Management
Goa: राज्यातील नद्यांची पातळी वाढली, सत्तरी तालुक्‍याला पुराची भीती; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

प्‍लास्‍टिकविरोधी चळवळ राबवणारे विक्रमादित्‍य पणशीकर म्‍हणतात...

गोवा सरकारने १९९६ मध्‍येच राज्‍यात प्‍लास्‍टिकला बंदी घातली. तरीही प्‍लास्‍टिकचा वापर सुरूच.

प्‍लास्‍टिक कचऱ्यामुळे कॅन्‍सरसह इतर काही आजारांचा फैलाव वाढत चालला आहे.

ग्रामीण भागांत अजूनही चूल पेटवण्‍यासाठी प्रामुख्‍याने प्‍लास्‍टिक पिशव्‍यांचा वापर केला जातो. त्‍याचा धूर शरीरात जाऊन ग्रामीण भागांतील जनतेत कॅन्‍सरसारखे आजार वाढत आहेत.

गोवा लहान, कमी लोकसंख्‍येचे राज्‍य आहे. त्‍यात गोवा आणि केंद्रात भाजपचेच सरकार असल्‍याने राज्‍य सरकारला प्‍लास्‍टिकमुक्त गोव्‍याचे स्‍वप्‍न निश्‍चित साकारता येणे शक्‍य आहे.

त्यासाठी प्‍लास्‍टिकची निर्मिती जिथून होते, त्‍यावर प्रथम घाव घालणे, घरोघरी कापडी पिशव्‍यांची निर्मिती होईल, याकडे गांभीर्याने लक्ष देणे आणि कापडी पिशव्यांच्या वापरास प्राधान्य देणे नितांत गरजेचे आहे.

पिशव्‍यांसह प्‍लास्‍टिकच्‍या इतर वस्‍तूंना तिलांजली देण्‍यासाठी सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनीही संघटित होऊन काम करणे आवश्‍यक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com