Smart City Dainik Gomantak
गोवा

Panjim Smart City: पणजी तुंबल्याची ‘स्मार्ट झलक’

मुसळधार पाऊस; अनेक दुकानांत शिरले पाणी

गोमन्तक डिजिटल टीम

Panjim Smart City पणजीत मंगळवारी सायंकाळी साडेसात ते साडेनऊपर्यंत जोरदार झालेल्या पावसाने पणजी शहरातील स्मार्ट सिटीच्या गटार व्यवस्थेवर प्रश्‍न उपस्थित केले. शहरातील 18 जून मार्ग पाण्याखाली गेल्याने काही दुकानांमध्येही पाणी शिरले आहे. याशिवाय सांतिनेज परिसरात गटारे भरून वाहून लागल्याने पुन्हा एकदा या परिसरात दुर्गंधी पसरली होती.

पहिल्यांदाच दोन तास पडलेल्या जोरदार पावसाने पणजीत पाणीच पाणी झाले. त्यामुळे स्मार्ट सिटीअंतर्गत निर्माण झालेल्या 300 मीटर अंतराच्या गटारव्यवस्थेवर प्रश्‍न निर्माण झाला आहे. 18 जून मार्गावर गुडघाभर पाणी साचले होते.

या मार्गावरून दुचाकीवरून जाणाऱ्यांनाही कसरत करावी लागत होती. शिवाय काही बंद असलेल्या दुकानांत शटर बंद असले तरी पाणी गेल्याचे बुधवारी सकाळी दिसून येईल, परंतु तत्पूर्वी काही खुल्या असणाऱ्या दुकानांमध्ये पाणी शिरल्याने त्यांना चांगलीच कसरत करावी लागली.

सांतिनेज परिसरातही गुडघाभर पाणी साचले होते. त्यामुळे सांतिनेज परिसरात पायी जाणाऱ्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. सांतिनजे ते मोक्ष स्मशानभूमीपर्यंत पाणी साचले होते. त्याशिवाय सांतिनेजमधील मलनिस्सारणाचे चेंबर तुडुंब भरल्याने घाण पाणी वर आले.

त्यामुळे पुन्हा एकदा दुर्गंधी पसरली आहे. दोन तासांत पावसाने पणजीत झालेल्या कामातील गलथानपणा उघड केला आहे. आल्तिनोकडे जाणाऱ्या मार्गाच्या दोन्ही बाजूची गटारे पावसाच्या पाण्याने भरून वाहू लागल्याने माती, कचरा रस्त्यावर आला होता.

काही दुचाकीस्वारही या कचऱ्यामुळे घसरल्याच्या घटना घडल्या. विशेष बाब म्हणजे पणजी तुंबण्याविषयीचे व्हिडिओ व छायाचित्रे समाज माध्यमांत त्वरित व्हायरल झाली. शिवाय पणजीतील कामावर टीका करण्याची संधी या माध्यमातून नेटकऱ्यांनी साधून घेतली.

महानगरपालिकेच्या नगरसेवकांना कामे करताना विश्‍वासात घेतले गेले नाही. शिवाय स्मार्ट सिटीच्या कामात संबंधित कंपनीने आपला हेका कायम ठेवला.

विशेष बाब म्हणजे कामावर चौफेर टीका झाल्यानंतर आमदारांनी व महापौरांनी तोंड उघडले. आता पणजीकरांनी पाणी तुंबण्याचा यापूर्वीसारखाच अनुभव घेतला आहे. त्यामुळे कामाविषयी आता दोष कोणाला द्यायचा, असा प्रश्‍न आहे. - उदय मडकईकर, नगरसेवक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS 3rd ODI: सिडनी वनडेत टीम इंडियाची प्रतिष्ठा पणाला; विराट कोहलीचा रेकॉर्ड 'फ्लॉप', पण रोहित शर्मा सर्वात यशस्वी फलंदाज!

Viral Video: 'पापी पोटासाठी' जीवघेणा खेळ! अंगावर फटाक्यांची माळ बांधून तरुणाचा स्टंट; सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल

IND vs AUS 3rd ODI: शाहिद आफ्रिदीचा 10 वर्ष जुना वर्ल्ड रेकॉर्ड धोक्यात! 'हिटमॅन' ठरणार वनडेचा सिक्सर किंग; मारावे लागणार फक्त 'इतके' षटकार

Malaika Arora Birthday: मलायका अरोरानं गोव्यात साजरा केला 50वा वाढदिवस, वयावरुन सोशल मीडियावर चर्चांना उधाण; अखेर बहिणीने केला खुलासा VIDEO

Goa Cabinet Decision: सरकारी नोकरीसाठी 'कोकणी' अनिवार्य! गोवा कॅबिनेटचा मोठा निर्णय; जीएमसी आणि मडगावातील ESI रुग्णालयांत कंत्राटी भरतीलाही मंजुरी

SCROLL FOR NEXT