Goa Congress : मुख्यमंत्र्यांची 'ती' घोषणा केवळ निवडणूक जुमला : युरी आलेमाव

म्हादई, खाणी, महागाई अधिवेशनातील महत्त्वाचे मुद्दे
Goa Congress
Goa CongressDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Congress : येत्या पावसाळी अधिवेशनात म्हादई, खाण व्यवसाय, कायदा व सुव्यवस्था, महागाई आणि रोजगार हे विषय सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी महत्त्वाचे असतील, असे सांगत विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्‍यातील तरुणांना ‘मुख्यमंत्री प्रशिक्षणार्थी योजने‘द्वारे रोजगार देण्याची केलेली घोषणा म्हणजे भाजपचा निवडणूक जुमला असल्याचा आरोप केला.

काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर आलेमाव यांनी आमदार अॅड. कार्लुस फेरेरा, एल्टन डिकॉस्‍टा तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्यासमवेत पर्वरी विधानभवनात पत्रकार परिषद घेतली. आगामी विधानसभा अधिवेशनात भाजप सरकारला उघडे पाडणे आणि कामकाजाची रणनीती ठरवणे यासाठी आपण सर्व सातही विरोधी आमदारांची बैठक घेणार आहे. भाजपने २०१२ मध्ये बेरोजगारी संपविण्याचे आश्वासन दिले होते.

Goa Congress
Goa-Mumbai Vande Bharat: रेल्वेमार्ग दुपदरीकरण झाल्यास मुंबई अवघ्या पाच तासांवर; मुख्यमंत्री सावंत

प्रत्यक्षात राज्याला दिवाळखोरीत ढकलले आणि आर्थिक आणीबाणी निर्माण केली. या असंवेदनशील सरकारने इव्हेंट मॅनेजमेंट आणि प्रसिद्धीवर कोट्यवधी रुपये खर्च केले. मुख्यमंत्री प्रशिक्षणार्थी योजना ही भाजप सरकारचा युवकांना मूर्ख बनविण्याचा आणखी एक जुमला आहे. या योजनेला १७ फेब्रुवारी २०२१ मध्ये मंत्रिमंडळाने मंजुरी दिली होती, याची आठवण आलेमाव यांनी करून दिली.

Goa Congress
Panaji Rainfall: पणजीत अर्धा-पाऊण तासाच्या मुसळधार पावसाने रस्त्यावर पाण्याचे लोट; वाहनधारकांची तारांबळ

जातीयवादी भाजपचे प्रयत्‍न हाणून पाडणार

आजच्या बैठकीत म्हादई, खाण व्यवसाय, पर्यावरण, महागाई, कायदा व सुव्यवस्था ढासळणे, इव्हेंटवर होणारा वायफळ खर्च, भ्रष्टाचार, पर्यटन उद्योगासमोरील संकट, वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, आपत्ती व्यवस्थापनची आकार्यक्षमता या मुद्यांवर चर्चा करण्यात आली. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर नजर ठेवून गोव्यात जातीय तेढ पसरवण्याचे भाजपचे जाणीवपूर्वक प्रयत्न हाणून पाडले जातील, असेही त्यांनी ठणकावून सांगितले. याप्रसंगी उपस्थित आमदार व प्रदेशाध्यक्षांनीही भाजप सरकारच्या अपयशावर टीका केली.

Goa Congress
Rajyasabha Poll: गोव्यासह बंगाल, गुजरातमधील राज्यसभेच्या जागांसाठी 'या' दिवशी निवडणूक; 10 जागांसाठी होणार मतदान

रोजगार खात्यामार्फत प्रशिक्षण पूर्ण केलेल्‍या युवकांना निश्चित मुदतीचा रोजगार मिळेल आणि त्यांना किमान वेतन १५ हजार रुपये दिले जाईल अशी घोषणा मुख्‍यमंत्र्यांनी केली होती. पण नंतर त्‍यांनी १२ जून रोजी युवकांना पंतप्रधान प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत ८ ते १० हजार रुपयांपर्यंत रोजगार देण्याची घोषणा केली. यावरून भाजप सरकार युवकांच्या भवितव्याशी खेळत असल्‍याचे स्‍पष्‍ट होते.

युरी आलेमाव, विरोधी पक्षनेते

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com