गोवा

वाळपईत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; झाडांची पडझड, विद्युत लाईन तुटली

गोमन्तक डिजिटल टीम

वाळपई परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. वाळपईच्या विविध भागात यामुळे झाडांची पडझड झाली असून, काही ठिकाणी विद्युत लाईन देखील तुटली आहे. विद्युत लाईन तुटल्याने अनेक भागातील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे.

हवामान खात्याने येत्या दोन दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. आज सायंकाळी पावसाने वाळपई परिसरात जोरदार हजेरी लावली. यामुळे झाडांची पडझड झाली तसेच, वीजच्या देखील तारा तुटल्या आहेत. रस्त्यात पडलेल्या झाडांमुळे काही ठिकाणी वाहतूक विस्कळित झाली. वीज ताऱ्या तुटल्याने वाळपई आणि वास्कोतील काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला.

दरम्यान, गोवा वीज खात्याचे कर्मचारी वीज पुरवठा सुरळित करण्यासाठी युद्धपातळीवर काम करत आहेत. तसेच, झाडांची पडझड झाल्याने ती झाडे देखील हटविण्याचे काम सुरू आहे. लवकरच वीज पुरवठा सुरळित केला जाईल असे वीज खात्याने म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT