Heat wave  Dainik Gomantak
गोवा

Heat Wave : सावधान उद्यापासून वाढणार उष्म्याचा कहर; आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन

Heat Wave : पुढील दोन-तीन दिवसांत म्हणजे सोमवारपासून राज्यातील तापमानात आणखी वाढ होणार असल्याची शक्यता गोवा वेधशाळेचे संचालक नहूष कुलकर्णी यांनी व्यक्त केली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Heat Wave :

पणजी, राज्यातील तापमानात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. त्यासोबतच ८० ते ९० टक्क्यांवर पोहोचलेल्या आर्द्रतेमुळे अंगाची लाही लाही होत असून लोक या उष्म्यापासून काही काळ तरी दिलासा मिळावा, यासाठी पावसाची वाट पाहात होते.

परंतु पुढील दोन-तीन दिवसांत म्हणजे सोमवारपासून राज्यातील तापमानात आणखी वाढ होणार असल्याची शक्यता गोवा वेधशाळेचे संचालक नहूष कुलकर्णी यांनी व्यक्त केली आहे.

राज्यातील तापमानाचा पारा सध्या ३३ ते ३४ अंशांवर पोचला आहे. अशातच जर तापमानाचा पारा वाढला तर नागरिकांना तो असह्य होणार आहे.

राज्यातील तापमान ज्यावेळी ३४ अंशांच्या पुढे जाईल, त्यावेळी ते सर्वसामान्य कमाल तापमानाचा टप्पा ओलांडेल. एका अर्थाने ती उष्णतेच्या लाटेची सुरवात असेल. त्यामुळे नागरिकांनी विशेषत: ज्येष्ठ नागरिक आणि मुलांच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.

वाढत्या तापमानाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील बहुतेक सर्वच प्रशासकीय यंत्रणांमार्फत लोकांनी आरोग्याची काळजी घेण्यासाठी मार्गदर्शन तत्त्वे जारी केली आहेत. आज राज्यात कमाल ३३.८ तर किमान २४.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. आज राज्यात ८३ टक्के एवढ्या सर्वाधिक आर्द्रतेची नोंद केली.

दक्षिण गोव्यात शनिवारी काही ठिकाणी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता होती. त्या अनुषंगाने ‘यलो अलर्ट’ही जारी केला होता; परंतु हा पाऊस आता कर्नाटकच्या दिशेने वळल्याने राज्यात पाऊस पडण्याची शक्यता कमी आहे. राज्यातील तापमान सध्या ३३ अंशांच्या आसपास आहे. येत्या दोन दिवसांत म्हणजेच सोमवारपासून ३५ अंशांवर पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी.

- नहूष कुलकर्णी, संचालक, गोवा वेधशाळा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT