Heat Wave Goa  Dainik Gomantak
गोवा

Heat Wave Goa : उकाडा असह्य, बंधाऱ्यांवर मुलांच्या उड्या; डिचोलीतील जलस्रोतांवर गर्दी

Heat Wave Goa : यंदा तापमानात प्रचंड बदल होऊन उकाडा असह्य होऊ लागल्याने डिचोलीतील काही भागातील जलस्रोतांवर आंघोळीसाठी गजबजाट होत असल्याचे दिसून येत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Heat Wave Goa :

डिचोली, उष्णतेचा पारा चढून उकाडा असह्य झाला आणि अंगाची लाही-लाही होऊ लागली, की प्रत्येकाला शीतल पाण्याचा थंडगार गारवा हवाहवासा वाटतो. अशावेळी मग प्रत्येकाला नदी, तलाव, बंधारे आदी जलस्रोत खुणावू लागतात.

यंदा तापमानात प्रचंड बदल होऊन उकाडा असह्य होऊ लागल्याने डिचोलीतील काही भागातील जलस्रोतांवर आंघोळीसाठी गजबजाट होत असल्याचे दिसून येत आहे. चिंतेची बाब म्हणजे आंघोळीसाठी असुरक्षित असलेल्या ''वाठादेव'' बंधाऱ्यावर चक्क लहान मुलांचा गजबजाट वाढत असल्याचे आढळून येत असून, मुलांच्या बंधाऱ्यावरील मुक्त वावराबाबतीत भीती व्यक्त होत आहे. सुरक्षेच्यादृष्टीने या बंधाऱ्यावरील लहान मुलांच्या वावरावर नियंत्रण येणे आवश्यक आहे.

डिचोली तालुक्यातील साखळी, कुडचिरे आदी काही ग्रामीण भागात जलस्रोत खात्यातर्फे लहान बंधारे बांधण्यात आले आहेत. त्यापैकी काही बंधारे आंघोळीसाठी आकर्षित करतात.

पंधरा वर्षांपासून वाठादेव बंधारा आंघोळीसाठी चर्चेत आला आहे. कारापूर-सर्वण पंचायत क्षेत्रात येणारा हा बंधारा आंघोळीसाठी तसा सुरक्षित नाही. या बंधाऱ्यातील पाण्याची पातळी खोल असून, ज्या ठिकाणी आंघोळ करतात, त्या पाण्यात पाणी खेचणारे मोठे पाईप आहे. बंधाऱ्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करायला हव्यात, अशी स्थानिकांची मागणी आहे.

फॅमिली बंधाऱ्यावर

शाळांना सुटी पडल्याने सध्या लहान मुलांचा नियमित बंधाऱ्यावर गजबजाट असतो. विशेष करून रोलिंग मिल परिसरातील काही मुलांचा या बंधाऱ्यावर जास्त वावर असतो. अशी माहिती मिळाली आहे. रविवारच्या दिवशी काही फॅमिली विशेषतः महिला आपल्या मुलांना घेऊन बंधाऱ्याच्या खालच्या बाजूने सुरक्षित ठिकाणी आंघोळ करताना दिसून येतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT