राज्यातील जमीन हडपप्रकरणी एसआयटीने प्राथमिक चौकशी केल्यानंतर राज्य सरकारने नियुक्त केलेल्या एकसदस्यीय आयगोमार्फत चौकशी सुरू आहे.
धारगळ येथील कथित जमीन हडपप्रकरणी मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांच्याविरुद्ध ॲड. आयरिश रॉड्रिग्ज यांनी सादर केलेल्या तक्रारीवरील सुनावणी सुरू झाली असून ती 20 रोजी पुढे सुरू होणार आहे.
अमेरिकास्थित रवळू खलप यांची जमीन आरोलकर यांनी हडप केल्याचा दावा केला आहे. त्यासंदर्भातची तक्रार रॉड्रिग्ज यांनी एसआटीकडे दिली होती.
मगोचे आमदार असताना जीत आरोलकर यांच्याविरुद्ध ॲड. रॉड्रिग्ज यांनी ही तक्रार खलप यांच्यावतीने क्राईम ब्रँचच्या विशेष तपास पथकाकडे सादर केली होती. मगो पक्षाने सरकारला पाठिंबा दिला असल्याने आरोलकर हे सत्ताधारी पक्षात आहेत तसेच ते गोवा गृहनिर्माण मंडळाचे अध्यक्षही आहेत.
आरोलकर यांनी खलप यांची जमीन हडप केली आहे व त्याचे भूखंड करून त्याची विक्री केली आहे. जमीन हडपप्रकरणाची चौकशी एसआयटीमार्फत सुरू आहे.
आयोगाकडे 46 तक्रारी
आयोगाकडे 46 तक्रारी सुनावणीसाठी आहेत. आयोगाने तक्रारदारांना तसेच संशयितांना त्यांची बाजू मांडण्यासाठी संधी देत प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगण्यात आले होते.
दरम्यान या आयोगाकडे काहींनी थेट तक्रारी दाखल केल्या आहेत. मागील सुनावणीवेळी ॲड. आयरिश रॉड्रिग्ज यांनी आमदार जीत आरोलकर यांच्याविरुद्ध धारगळ येथील कथित जमीन हडपप्रकरणीची बाजू मांडण्यास सुरू केली होती.
त्यासंदर्भातचे काही दस्तावेजही आयोगासमोर ठेवले होते. ती सुनावणी अपूर्ण राहिल्याने ती 20 मार्चपर्यंत तहकूब करण्यात आली होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.