Mahesh Manjrekar: 'वेडात मराठे वीर दौडले सात' चित्रपटाच्या शूटिंगवेळी झाला मोठा अपघात

Mahesh Manjrekar: 19 वर्षाचा एक मुलगा 100 फूट खाली कोसळला आहे.
Mahesh Manjrekar
Mahesh ManjrekarDainik Gomantak
Published on
Updated on

Mahesh Manjrekar: महेश मांजरेकर दिग्दर्शित मराठी चित्रपट वेडात मराठे वीर दौडले सातच्या सेटवरुन एक मोठी बातमी समोर आली आहे. या चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान, सज्जा कोठीजवळच्या पहाडावरुन 19 वर्षाचा एक मुलगा 100 फूट खाली कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, त्याच्या डोक्याला आणि छातीला मार बसला असून त्याची स्थिती गंभीर आहे.

अपघात झालेल्या मुलाचे नाव नागेश खोबरे असे नाव असून तो मूळचा सोलापूरचा आहे. महेश मांजरेकरांच्या या चित्रपटाचे काही दिवसापासून कोल्हापूर( Kolhapur )मधील पन्हाळ्यात हे शूटिंग सुरु होते. नागेश याठिकाणी घोड्यांची देखभाल करण्याचे काम करत होता.

Mahesh Manjrekar
Air India: धक्कादायक! मुंबईत येणाऱ्या विमानाचे हवेतच प्रवाशाकडून दार उघडण्याचा प्रयत्न

दरम्यान, यावेळी हा अपघात झाला तेव्हा तो पहाडीच्या कोपऱ्यावर उभा राहून फोनवर बोलत असल्याची माहिती मिळाली आहे. घटनास्थळी पोलिस( Police ) पोहचले होते मात्र पोलिसांनी याबाबत कोणतीही माहिती दिली नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com