High Court Dainik Gomantak
गोवा

पूजा शर्मा हाजीर हो! अटकपूर्व जामीन मंजूर पण चौकशी अटळ, SIT समोर हजर राहण्याचे आदेश

Assagao House Demolition Case: आसगाव येथील ६०० चौरस मीटर जमीन पूजा हिने खरेदी केली आहे.

Pramod Yadav

आसगाव येथे प्रदीप आगरवाडेकर यांचे घर मोडण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणातील संशयित पूजा शर्मा हिला सोमवारी (ता. २२) गुन्हे अन्वेषण विभागाने स्थापन केलेल्या विशेष तपास पथकासमोर चौकशीसाठी उपस्थित राहावे लागणार आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने पूजा हिला अटकपूर्व जामीन मंजूर करताना ही अट घातली आहे. पूजा हिला अटक केली तर तिची ५० हजार रुपयांच्या जामिनावर मुक्तता करावी, असेही न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्जावर दिलेल्या निवाड्यात म्हटले आहे.

आसगाव येथील ६०० चौरस मीटर जमीन पूजा हिने खरेदी केली आहे. त्या जमिनीत असलेले घर पाडण्याचा तिने प्रयत्न केल्याचा आरोप आहे.

प्रदीप यांची पत्नी प्रिंशा हिने आपल्या मुलाचे व पतीचे अपहरण झाले होते, तसेच आपले घर मोडण्याचा प्रयत्न झाला, अशी पोलिस तक्रार केली होती. त्यानंतर ही तक्रार मागे घ्यायची आहे, असे लेखी स्वरूपात तिने पोलिसांना कळविले. मात्र, एफआयआर दाखल झाल्याने न्यायालयाच्या परवानगीविना तपासकाम थांबवणे पोलिसांना शक्य झाले नाही.

सरकारने या प्रकरणी तपासकाम सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. पोलिस अटक करतील, या भीतीने पूजा हिने जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. तो तेथे नामंजूर झाला शिवाय तिच्या कोठडीतील चौकशीची गरज न्यायालयाने व्यक्त केली होती. या निवाड्याला तिने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT