Yuri Alemao | Goa Government Jobs Dainik Gomantak
गोवा

गोवा पोलिसांना सरकारने नाईट क्लबकडे गहाण ठेवलंय का? डिजीपींनी स्पष्टीकरण द्यावे; आलेमाव

गोव्यात येणारे दर्जेदार पर्यटक गमावण्यास भाजप सरकारचे ‘माफिया राज’ जबाबदार - युरी आलेमाव

Pramod Yadav

वेळेच्या बंधनाबाहेर कर्णकर्कश संगीत वाजवल्याच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेलेल्या हणजुणे येथील स्थानिकांवर क्लब चालकांनी हल्ला केला.

'या दादागिरीचा मी तीव्र निषेध करतो. गोव्यातील पोलीस दल हे भाजप सरकारने नाईट क्लबकडे गहाण ठेवलंय का यावर पोलीस महासंचालकानी स्पष्टीकरण द्यावे व हणजुणे येथील हल्लेखोरांवर कारवाई करावी,' अशी मागणी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली आहे.

'या घटनेने स्थानिक गोमंतकीयांच्या विरोधातील बाहेरच्यांची दादागिरी व उर्मटपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. किनारी भागात भाजप सरकारच्या आशीर्वादाने आज सर्व प्रकारचे माफिया कार्यरत आहेत. हे माफिया गोवा आणि गोमंतकीयांसाठी सर्वात मोठा धोका आहे,' असा दावा युरी आलेमाव यांनी केला.

'स्थानिक रहिवाशांना कर्णकर्कश संगीताच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात जाण्यास भाग पाडले जाते यावरुन कायद्याची अंमलबजावणी करणार्‍यांचे नाईट क्लबवाल्यांशी संगनमत असल्याचे उघड होते. सरकारी अधिकाऱ्यांना क्लबवर कारवाई करण्यापासून कोण रोखते,' असा सवाल युरी आलेमाव यांनी केला.

गोव्यात भेट देणाऱ्या विदेशी पर्यटकांमध्ये कमालीची घट झाल्याने राज्यातील ढासळलेल्या कायदा व सुव्यवस्थेचे विपरीत परिणाम आता दिसू लागले आहेत.

यावर्षी जवळपास 65 टक्के विदेशी पर्यटकांची घट झाली आहे. गोव्यात येणारे दर्जेदार पर्यटक गमावण्यास भाजप सरकारचे ‘माफिया राज’ जबाबदार आहे, असे युरी आलेमाव यांनी नमूद केले.

पोलीस महासंचालकांनी कोणत्याही राजकीय दबावाखाली न येता कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणा आलेमाव यांनी केलीय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT