Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa viral video Case:हरियाणाची गर्लफ्रेन्ड महाराष्ट्रातील पोलिस बॉयफ्रेन्ड; अश्लील व्हिडिओ पाठवताच पतीने केली आत्महत्या; लव्हबर्ड्सला गोव्यातून अटक

Haryana Crime News: दोघेही पतीवर त्याच्या वडिलांना जीवे मारण्यासाठी आणि जमीन विकण्यासाठी त्याच्यावर दबाव आणत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Pramod Yadav

Anjuna Couple Arrested: पोलिस कॉन्स्टेबल प्रियकरासोबतचा अश्लील डान्स व्हिडिओ पतीला पाठवल्याने पतीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रोहतक, हरियाणा येथे उघडकीस आली आहे. हरियाणा पोलिसांनी याप्रकरणी पत्नी दिव्या आणि तिचा प्रियकर दीपक याला गोव्यातून अटक केली आहे. दोघेही गोव्यातील हणजूण येथे लपून बसले होते. गेल्या महिन्यात १८ जून रोजी ही घटना घडली.

दिव्या (२७, रा. रोहतक, हरियाणा) आणि दीपक (३५, रा. संभाजीनगर, महाराष्ट्र) असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. संशयित प्रियकर दीपक पोलिस कॉन्स्टेबल असल्याची माहिती समोर आली आहे. दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. काही दिवसांपूर्वी दिव्या आणि दीपक यांच्यातील अश्लील डान्सचा व्हिडिओ पतीला पाठवला, यानंतर काही वेळातच पतीने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी तात्काळ या प्रकरणाची दखल तपास सुरु केला.

दोघेही गोव्यात लपून बसल्याची माहिती हरियाणा पोलिसांना मिळाली, गोवा पोलिसांना याची माहिती मिळताच हणजूण पोलिसांनी दोघांना अटक केली. दरम्यान, दोघांना न्यायलयाकडून जामीन मिळाल्याची ताजी माहिती समोर आली आहे. दिव्याने पती मगन याचा मानसिक आणि भावनिक छळ करुन त्याला आत्महत्या करण्यास भाग पाडल्याचा त्याच्या घरच्यांचा आरोप आहे.

पतीने व्हिडिओ पाहिल्यानंतर गळफास लावून घेतला

पत्नी दिव्याने हॉटेलमध्ये प्रियकर दीपकसोबत एक अश्लील व्हिडिओ बनवला आणि तो मगनला पाठवला. पत्नी आणि तिचा पोलिस प्रियकर यांच्या कृत्यांमुळे तो मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झाला आहे. यामुळे तो आत्महत्या करत आहे, असा एक व्हिडिओ बनवून मगनने आत्महत्या केली.

दोघेही त्याच्या वडिलांना जीवे मारण्यासाठी आणि जमीन विकण्यासाठी त्याच्यावर दबाव आणत आहेत. या पैशातून त्याला मुंबईत एक फ्लॅट खरेदी करायचा होता, असा आरोपही त्याने केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Quepem: केपे गणेशोत्‍सवाची लॉटरी ठरली 'हिट', काही तासांतच 1.5 लाख तिकिटांची विक्री

Cricketer Death: क्रिडाविश्वात खळबळ, 22 वर्षीय क्रिकेटपटूचा मृत्यू; जिममध्ये आला हृदयविकाराचा झटका आला

Bardez: घरे नियमित करण्याचा निर्णय ऐतिहासिक, विरोधकांचा विरोध डावलून विधेयक मंजूर - दयानंद सोपटे

Prajwal Revanna: माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला अत्याचार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा

देशवासीयांनो आता फक्त 'स्वदेशी' वापरा, वाराणसीतून पंतप्रधान मोदी यांचे आवाहन

SCROLL FOR NEXT