Harvalem Waterfalls Dainik Gomantak
गोवा

हरवळे धबधबा अजूनही प्रवाहित

मोसमी पावसाळा सूरू होईपर्यंत तरी धबधबा आटण्याची शक्यता कमीच आहे.

दैनिक गोमन्तक

डिचोली: पावसाळा जवळ आला असला, तरी पावसाळी पर्यटनासाठी जगप्रसिद्ध असलेला हरवळे धबधबा यंदा अजूनही प्रवाहित असून, मोसमी पावसाळा सूरू होईपर्यंत तरी धबधबा आटण्याची शक्यता कमीच आहे.

पावसाळ्यात हा धबधबा घसघसून वाहत असतो. पाऊस पावसाळा संपल्यानंतर दरवर्षी साधारण एप्रिल-मे महिन्यात या धबधब्याचा प्रवाह कमी होत असतो. बऱ्याचदा मे महिन्याच्या मध्यापर्यंत हा धबधबा पूर्णपणे आटत असतो. यापुर्वी ऐन शिवरात्री उत्सवावेळी खाणपिटातील पाणी सोडून हा धबधबा प्रवाहित करण्यात आला होता. यावर्षी मात्र अजूनही धबधब्याचा प्रवाह समाधानकारक आहे. अजूनपर्यंत अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे धबधबा कायम प्रवाहित राहिला आहे.

पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असला, तरी या धबधब्यावर स्थानिक पर्यटकांची ये-जा चालूच असली, तरी सुटीचे दिवस वगळता अन्य दिवशी पर्यटकांचा आकडा कमी असतो. अधूनमधून विदेशी पर्यटकही या धबधब्यावर येतात, असे येथील नागरिकांनी सांगितले.

सुरक्षा व्यवस्था तैनात

हरवळे धबधब्याच्या पायथ्याशी पाण्यात आंघोळ करणे धोक्याचे असल्याने सध्या धबधब्यावर सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. धबधब्यावर आंघोळ करताना यापूर्वी काही पर्यटकांना जीव गमवावे लागले आहेत. प्राणहानी टाळण्यासाठी धबधब्यावर सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT