Harmal Dainik Gomantak
गोवा

Harmal News : डबल इंजीन सरकारमुळेच विकास : दयानंद सोपटे

Harmal News : मांद्रे मतदारसंघाचे भाजपचे प्रवक्ते दयानंद सोपटे यांनी उमेदवार श्रीपाद नाईक यांच्या विजयाचा दावा केला असून डबल इंजीन सरकार असल्याने राज्यात झपाट्याने विकासकामे मार्गी लावली आहेत. काँग्रेस पक्षाने केवळ भ्रष्टाचार केला व देशाला लुटले, असे मत त्यांनी व्यक्त केले.

गोमन्तक डिजिटल टीम

Harmal News :

हरमल, उत्तर गोवा लोकसभा निवडणुकीत भाजपने घरोघरी जाऊन प्रचारास प्रारंभ केला असून काल मांद्रे श्री भगवती सप्तेश्र्वर मंदिरात श्रीफ ळ ठेवून प्रचारास प्रारंभ केला.

मांद्रे मतदारसंघाचे भाजपचे प्रवक्ते दयानंद सोपटे यांनी उमेदवार श्रीपाद नाईक यांच्या विजयाचा दावा केला असून डबल इंजीन सरकार असल्याने राज्यात झपाट्याने विकासकामे मार्गी लावली आहेत. काँग्रेस पक्षाने केवळ भ्रष्टाचार केला व देशाला लुटले, असे मत त्यांनी व्यक्त केले.

ते पुढे म्हणाले, भ्रष्टाचारी काँग्रेसने देशाला लुटले असून उमेदवारही तसेच आहेत. उमेदवाराने सहकारी संस्था स्वतःच्या कुटुंबाच्या असल्याचे मानून जनतेचे नुकसान केले. कित्येक लोकांच्या बॅंकेत ठेवी अडकवल्या, पैसे बुडाले, कित्येकांचे रोजगार गेले, कित्येकांना कोर्टाच्या पायऱ्या चढण्यास मजबूर केले.

अशा भ्रष्ट राजकारण्यांच्या भूलथापांना मतदारांनी बळी पडू नये. विकसित भारतासाठी भाजपच्या विविध योजना असून गतीने विकास होत आहे. पंतप्रधान मोदींसाठी दोन्ही उमेदवारांना विजयी करायला हवे.

यावेळी मांद्रे मतदारसंघाचे मंडल उपाध्यक्ष गोविंद आसगावकर सरचिटणीस रवी गोवेकर, सुनील परब, धीरज मांद्रेकर तसेच बूथ प्रमुख, पदाधिकारी, शक्ती केंद्र प्रमुख, पन्ना प्रमुख व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

भरीव योगदान

भाजपचे उमेदवार श्रीपाद नाईक यांनी राज्य व देशासाठी भरीव योगदान दिले आहे. निष्कलंक व स्वच्छ चारित्र्याचा उमेदवार ही भाजपच्या जमेची बाजू असून जनतेने भाजपला भरभरून मतदान करण्याचे आवाहन अरुण नाईक यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT