Milagris Saibin Dainik Gomantak
गोवा

Milagris Saibin : मिलाग्रीस सायबिणीस तेल अर्पण; भक्तांची गर्दी

फेस्तानिमित्त पहाटेपासून प्रार्थनासभांचे आयोजन

दैनिक गोमन्तक डिजिटल

येथील मिलाग्रीस सायबिणीचे फेस्त भक्तिभावाने सोमवारी (ता.24) साजरे झाले. ईस्टरनंतरच्या तिसऱ्या सोमवारी साजऱ्या होणाऱ्या या मिलाग्रीस सायबिणीच्या फेस्ताला गोव्यासह शेजारील राज्यांतून सर्व धर्मांतील भक्तगण मोठ्या संख्येने हजेरी लावतात.

त्यानुसार, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीदेखील उपसभापती जोशुआ डिसोझा यांच्यासह चर्चला भेट देऊन सायबिणीच्या मूर्तीवर तेल अर्पण केले. यावेळी नगराध्यक्ष प्रिया मिशाळ, उपनगराध्यक्ष विराज फडके व इतर नगरसेवक हजर होते.

भक्तांच्या हाकेला धावणारी सायबीण म्हणून ख्रिश्चन तसेच हिंदू व इतर समाजातील भाविकांत सायबिणीबाबत श्रद्धा आहे. फेस्तावेळी मिलाग्रीस सायबीण व तिच्या कडेवरील येसू ख्रिस्त यांच्या प्रतिमेवर भक्तांकडून तेल, फुले व मेणबत्ती अर्पण करण्याची प्रथा आहे. फेस्तानिमित्त सेंट जेरॉम चर्चमध्ये पहाटे 5.30 वा.पासून सायंकाळपर्यंत कोकणी व इंग्रजीमध्ये प्रार्थना झाल्या.

फेस्त, जत्रा एकाच दिवशी

मिलाग्रीस सायबीण ही शिरगावच्या श्री लईराई देवीची बहीण म्हणून भक्तगणांत ओळखली जाते. श्री लईराईची जत्रा यंदा सोमवारीच साजरी झाली. 13 वर्षांनी हे फेस्त व जत्रा एकाच दिवशी साजरी झाली. शिरगावहून सायबिणीला तेल तर म्हापशाहून देवी लईराईला फुले भेट देण्याची परंपरा आहे. ही परंपरा कित्येक वर्षापासून अखंडितपणे सुरू आहे.

असा फेडतात नवस

म्हापशातील धार्मिक सलोखा राखणारा हा एकमेव फेस्ताचा उत्सव आहे. नवसाला पावणारी देवी म्हणून मिलाग्रीस सायबिणीवर भक्तगणांची श्रध्दा असून यामुळे सायबीणीला तेल, मेणबत्ती व फुले अर्पण केली जातात. या दिवशी भाविक नारळाची कवटी घेऊन भीक मागतात व आपले नवस फेडतात. ख्रिश्चन बांधवांसह हिंदू व इतर समाजातील लोक या फेस्तात सहभागी होतात

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Deepti Naval: ‘कला का सबसे सुंदर रूप छिपाव है'! बहुगुणी, चिंतनशील अभिनेत्री 'दीप्ती नवल'

Tracy De Sa: तरुणाईला थिरकवणारी हिप-हॉप स्टार, मूळ गोमंतकीय असणारी रॅपर 'ट्रेसी डी सा'

Goa Accidents: गोव्यात रस्त्यावर गाडी हाकणे वा चालणे दिव्य ठरत आहे; अपघातांचे प्रमाण आणि रस्ता सुरक्षा सप्ताह

Mapusa Police Quarters: म्हापसा पोलिसांचे ‘क्वाटर्स’ मोडकळीस! ‘साबांखा’चे दुर्लक्ष; कर्मचाऱ्यांची गैरसोय

मुंबईतही सुरु होणार गोव्यासारखी पायलट सेवा! रिक्षा-टॅक्सीला पर्याय, दर खिशाला परवडणारा; माहिती घ्या

SCROLL FOR NEXT