Goa GI Tag: गोव्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण असलेली चार उत्पादने बेबिंका, मानकुराद आंबा, सात शिऱ्यांची भेंडी आणि आगाशी येथील वांगी जीओग्राफिकल इंडिकेशन (GI) रजिस्ट्रीच्या जर्नलमध्ये प्रकाशित झाली आहेत.
जीआय टॅग मिळविण्याच्या प्रक्रियेतील हा अंतिम टप्पा आहे. या उत्पादनांना 3 महिन्यांपेक्षा कमी कालावधीत अधिकृतपणे GI टॅग मिळेल.
जर्नलमध्ये प्रकाशनाच्या तारखेपासून 90 दिवसांत या उत्पादनांना अधिकृतपणे GI दर्जा प्राप्त होईल. 91 व्या दिवसापासून ही उत्पादने नोंदणीकृत मानली जातील आणि GI प्रमाणपत्र त्वरित जारी केले जाईल.
गोव्यातील जीआय टॅगसाठीचे नोडल अधिकारी असलेल्या दीपक परब यांच्या हवाल्याने इंग्रजी माध्यमांनी याबाबतचे वृत्त दिले आहे.
गेल्या काही काळापासून या उत्पादनांना जीआय टॅग मिळावा, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या चार उत्पादनांपैकी बेबिंका ही गोवन मिठाई आहे.
दरम्यान, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग ही गोव्यातील उत्पादनांसाठी GI नोंदणी करण्यासाठी नोडल एजन्सी आहे.
जीआय टॅग मिळण्याच्या रांगेत गोव्याच्या काजुचाही समावेश आहे. त्यामुळे वरील चार उत्पादनांशिवाय काजूलाही आगामी काळात जीआय टॅग मिळेल.
प्रक्रिया केलेल्या गोवन काजुसाठीचा अर्ज मंजूर झाला असला तरी अर्ज दाखल करण्यास विलंब झाल्याने तो GI जर्नलच्या पुढच्या आवृत्तीत मे महिन्यापर्यंत प्रकाशित होऊ शकेल. त्यानंतर गोवन काजुलादेखील GI टॅग प्राप्त होईल.
दरम्यान, काजू फळालाही जीआय टॅग मिळावा यासाठी अर्ज तयार करण्यासाठी राज्य सरकारने शुक्रवारी गोवा काजू उत्पादक संघटनेची बैठक आयोजित केली आहे.
GI Tag च्या अंतिम टप्प्यात असलेली उत्पादन
बेबिंका, मानकुराद आंबा, सात शिऱ्यांची भेंडी, आगाशीची वांगे
GI Tag मिळण्याच्या रांगेत असलेले उत्पादन
गोवन काजू
सध्या प्रक्रियेत असलेली उत्पादने
गोवन सॉसेज, मुशरात आंबा, कुणबी साडी, नारळ आणि शिंपल्यांपासून हस्तकलेद्वारे बनवलेली उत्पादने
या उत्पादनांनादेखील GI Tag मिळण्याची शक्यता
मांगिलाल आंबा, कोरगुट भात, ताळगावची वांगी
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.