Teja Sajja Dainik Gomantak
गोवा

Teja Sajja At IFFI: 'सुपरस्टार चिरंजीवी माझ्यासाठी पितृतुल्य'! Hanuman Fame अभिनेत्याने दिला चांगला चित्रपट बनवण्याचा कानमंत्र

IFFI 2024: कलाकार म्हणून अभिनयातून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याला प्राधान्य देतो. सिनेरसिकांचे प्रेम हाच माझ्यासाठी पुरस्कार आहे, असे प्रसिद्ध तामीळ चित्रपट अभिनेता तेजा सज्जा याने सांगितले.

गोमन्तक डिजिटल टीम

गंगाराम आवणे

अडीच वर्षांचा असताना बालकलाकार म्हणून मी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. परंतु आता ‘हनुमान’ चित्रपटामुळे मला देशभर ओळख मिळाली. त्यामुळे पुढील वाटचालीची जबाबदारी वाढली आहे. कलाकार म्हणून अभिनयातून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याला प्राधान्य देतो. सिनेरसिकांचे प्रेम हाच माझ्यासाठी पुरस्कार आहे, असे प्रसिद्ध तामीळ चित्रपट अभिनेता तेजा सज्जा याने सांगितले.

दक्षिणेतील सुपरस्टार चिरंजीवी यांनी मला बालकलाकार म्हणून ‘चुडालानी वुंदी’ या चित्रपटात पहिल्यांदा काम करण्याची संधी दिली. त्यांच्यामुळेच मी आज चित्रपटसृष्टीत कार्यरत आहे. ते नसते तर मी घडलोच नसतो. त्यामुळे चिरंजीवी माझ्यासाठी पितृतुल्य आहेत, असे तेजा म्‍हणाला.

तेलगू चित्रपटसृष्टीत मागील तीस-चाळीस वर्षांपासून अतिशय उत्तम चित्रपट प्रदर्शित होत आहेत. उत्तम अभिनय, पटकथा, संगीत याचा समृद्ध वारसा लाभला आहे. मागील काही वर्षांत तेलगू चित्रपटांकडे साऱ्या जगाचे लक्ष गेले. परंतु हे केवळ तेलगू चित्रपट चाहत्यांमुळे शक्य झाले.

या सिनेरसिकांनी दिलेल्या प्रेमापोटीच तेलगू चित्रपटसृष्टी समृद्ध झाली आणि आज तिला जागतिक पटलावर मानाचे स्थान प्राप्त होत आहे, असेही तेजा याने अभिमानाने सांगितले.

भारत बनेल आंतरराष्‍ट्रीय चित्रपटसृष्टीचा केंद्रबिंदू

जर आपल्याला गुणवत्तापूर्ण चित्रपट द्यायचे असतील तर चित्रपटांसाठी अधिक कालावधी द्यावा लागतो. ‘पुष्पा’, ‘आरआरआर’, ‘बाहुबली’ यासारखे चित्रपट बनविण्यासाठी अनेक वर्षे लागली. ‘हनुमान’ या चित्रपटासाठी मी मागील तीन वर्षे काम करत आहे. भारतीय चित्रपटांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकण्‍याची क्षमता आहे. येणाऱ्या काळात भारत हा आंतरराष्ट्रीय स्तरावर चित्रपटसृष्टीचा केंद्रबिंदू बनेल, असे तेजा सज्जा म्‍हणाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs 2026: व्यापाऱ्यांसाठी जॅकपॉट अन् नोकरदारांना पगारवाढ! ऑगस्ट महिन्यात 'या' राशीची चांदीच चांदी; पैशांची चिंता कायमची मिटणार

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

Bori Road Safety Issue: बोरीतील धोकादायक साकवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? कठडा तुटल्याने वाहनचालकांच्या जीवाला धोका, तातडीने दुरुस्तीची गरज

Garuda Lenka: राजासाठी जीव देण्याची शपथ, मृत्यूची बातमी मिळताच आत्मबलिदान; होयसळ साम्राज्याच्या ‘गरुड लेंका’ योद्ध्यांची रोमांचकारी गाथा

Viral News: आश्चर्य..! दोन तोंड अन् आठ पायांच्या वासराचा जन्म; तब्बल 5 तास चालली प्रसूतीची शस्त्रक्रिया Watch Video

SCROLL FOR NEXT