Goa Road  Dainik Gomantak
गोवा

Goa Road Condition: चिंबल पुलाचे निम्मे काम पूर्ण: रुडॉल्फ

Goa Road Condition: उर्वरित काम लवकर करण्यासाठी प्रयत्नरत

दैनिक गोमन्तक

Goa Road Condition:

चिंबल जंक्शन येथील उड्डाणपुलाचे काम सुरू असून सुमारे 60 टक्के काम पूर्ण झाले आहे. रायबंदर रस्ता बंद झाल्यामुळे या जंक्शनच्या ठिकाणी नेहमी वाहतुकीची कोंडी होत असल्याने हे काम बंद करण्याची मागणी काहींनी केली असली तरी ती मान्य केली जाणार नाही.

या जंक्शनवर अनेक अपघात होऊन स्थानिकांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे हा उड्डाणपूल लवकरात लवकर पूर्ण व्हावा यासाठी आपण प्रयत्न करत असल्याची माहिती सांताक्रुझचे आमदार रुडॉल्फ फर्नांडिस यांनी दिली.

रायबंदर येथील रस्त्याचे काम हे दहा वर्षांपूर्वीचे आहे. ते गेली अनेक वर्षे रखडले होते. सांताक्रुझ मतदारसंघातील कामे व्हावीत यासाठी सत्ताधारी भाजपात आलो, तेव्हापासून अनेक कामांना चालना मिळाली, असे रुडॉल्फ म्हणाले.

बोंडवेल तलाव पाणथळ भाग!

रुडॉल्फ फर्नांडिस यांनी सांगितले की, सांताक्रुझ येथील बोंडवेल तलावातील पाणी काही अज्ञातांनी सोडून ते आटविले होते. याविरोधात स्थानिकांनी तक्रारी केल्यानंतर तेथे असलेल्या व्हॉल्वच्या सुरक्षिततेसाठी आवश्‍यक ती सुरक्षा उभारण्यात आली आहे.

केंद्र सरकारने बोंडवेल तलावाला पाणथळ (ओलसर जमीन) म्हणून घोषित केले असल्याने तेथे कोणालाही हस्तक्षेप करता येणार नाही. यासंदर्भात जुने गोवे पोलिसांत अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT