Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime : गोव्यात माफिया वॉर? कुडचडे येथे एका कामगाराचा खून

बेकायदेशीर रेती व्यवसायातून खून झाल्याचा संशय; पोलीस घटनास्थळी दाखल

सुशांत कुंकळयेकर

Goa Crime : माड बाणसाय कुडचडे येथे एका कामगारांचा गोळी झाडून खून करण्यात आला आहे, तर गोळीबारात एक गंभीर जखमी झाला आहे. बेकायदेशीर रेती व्यवसायातून खून झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. कुडचडे परिसरात माफिया वॉर सुरु असल्याची चर्चाही आता सुरु झाली आहे.

बुधवारी रात्री 1.30 वाजण्याच्या सुमारास ही गोळीबाराची घटना घडली आहे. पोलीस घटनास्थळी हजर झाले असून त्यांनी पंचनामा केला आहे. या गोळीबारात ज्या कामगाराचा मृत्यू झाला आहे त्याचं नाव युसुफ आलम (23) असून तो मूळचा झारखंडचा रहिवासी असल्याची माहिती आहे. तर या गोळीबारात जखमी झालेल्या कामगाराचं नाव महमद साहू (33) असं आहे. तीन कामगार होडी घेऊन रेती काढण्यास जात असताना अज्ञाताने गोळीबार केल्याची माहिती आहे.

बाणसाय कुडचडे येथे बेकायदेशीर रेती व्यवसायातून एका कामगाराचा गोळी झाडून खून केल्याची खळबळजनक घटना घडली असून यात एक कामगार गंभीर जखमी झाला. त्याच्यावर गोमेकॉत उपचार सुरू असून एक कामगार या हल्ल्यातून सुदैवाने बचावला आहे.

सदर घटना काल मध्यरात्री सुमारे दीड वाजता घडली असल्याचे पोलीस अधिक्षक सेमी तावारीस यांनी सांगितले. रेती आणण्यासाठी होडी घेऊन जात असताना अज्ञात व्यक्तीने या कामगारांवर गोळी झाडली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Highway: जमिनी गेल्या, रस्ताही अडला; उगवेकरांचा संताप, एनएच 66 मुळे दैनंदिन जीवन विस्कळीत; मोबदल्याची अद्याप प्रतीक्षा

Bicholim Hit And Run Case: सुरक्षेचा 'तिसरा डोळा' ठरला कर्दनकाळ; अपघातानंतर पळणाऱ्या चालकाच्या मुसक्या आवळल्या, डिचोली पोलिसांची कारवाई

"वाघांचे मृत्यू अन् वन विभागाचे अपयश"; पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांचा थेट प्रहार!

Goa Crime: काकाची हत्या करून मावशीकडे घेतला आश्रय! बोरी येथील दीपक नाईक हत्या प्रकरणातील संशयित नराधम पोलिसांच्या तावडीत

Goa Accident: अटल सेतूवर विचित्र अपघात! 1 नाही, 2 नाही... 7 गाड्या एकमेकांना धडकल्या, वाहतूक विस्कळीत; Watch Video

SCROLL FOR NEXT