Dainik Gomantak
गोवा

गुजरातमधील वॉन्टेड आरोपीला गोव्यात अटक, मल्टीलेव्हल मार्केटिंग स्कॅमसह इतर गुन्ह्यात सहभागी

दुबईमधून परतल्यावर दाबोळी विमानतळावर संशयित उतरताच पोलिसांना त्याला ताब्यात घेतले.

Pramod Yadav

गुजरातमधील वॉन्टेड आरोपीला पाच डिसेंबर रोजी गोव्यात अटक करण्यात आली. संशयिताच्या विरोधात काढलेल्या लुकआउट नोटीसमुळे त्याला अटक करण्यास पोलिसांना मदत झाली.

दुबईमधून परतल्यावर दाबोळी विमानतळावर संशयित उतरताच पोलिसांना त्याला ताब्यात घेतले.

प्रशांत कुमार कमलेशभाई ब्रह्मभट्ट (वय 32, रा. मकरपुरा, गुजरात) असे अटक आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संशयित प्रशांत याचा मल्टीलेव्हल मार्केटिंग स्कॅमसह इतर दोन गुन्ह्यात सहभाग असल्याचे उघडकीस आले आहे.

संशयित प्रशांतचा 2.32 कोटी रुपयांच्या मल्टीलेव्हल मार्केटिंग गुंतवणूक योजनेच्या फसवणुकीशी संबंधित गुन्हात सहभाग उघडकीस आला होता. जवळपास दीड वर्षांपासून तो फरार होता.

संशयिताला दाबोळी विमानतळावर ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी तात्काळ गुजरातमधील आर्थिक गुन्हे शाखेला माहिती दिली. ईओडब्ल्यूच्या गोव्यात आलेल्या पथकाने संशयिताला ताब्यात घेतले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT