Crime Dainik Gomantak
गोवा

रोजगाराच्या शोधात आलेल्या गुजराती युवकाने फोंड्यात केली आत्महत्या

युवकाने अपेक्षेप्रमाणे रोजगार मिळाला नसल्याने नैराश्यातून आत्महत्या केली असावी असा कयास त्याच्या कुटुंबियांनी पोलिसांकडे (Police) बोलताना व्यक्त केला.

दैनिक गोमन्तक

गुजराती युवकाने फोंड्यात आत्महत्या करण्याचा प्रकार घडला असून रोजगाराच्या शोधात आलेल्या या युवकाने अपेक्षेप्रमाणे रोजगार मिळाला नसल्याने नैराश्यातून आत्महत्या केली असावी असा कयास त्याच्या कुटुंबियांनी पोलिसांकडे (Police) बोलताना व्यक्त केला. मूळ गुजरात (Gujarat) राज्यातील पण दोन महिन्यापूर्वी फोंड्यात रोजगाराच्या शोधात आलेल्या जोहराभाई सेंदाभाई भांगडा (Johrabhai Sendabhai Bhangra) वय 17 या युवकाने काल रविवारी रेटॉल हे विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या केली. जोहराभाईचा भाऊ प्रभूनगर कुर्टी भागात राहतो. त्याच्याचकडे तो आला होता.

काही दिवसांपूर्वी त्याला फोंडयातील (Fonda) एका स्टील मार्ट दुकानात नोकरी मिळाली होती पण तो या नोकरीने खूष नव्हता. अधिक चांगल्या पगाराची त्याला अपेक्षा होती. काल रात्री त्याने आपला भाऊ व इतर सहकार्‍यांसमवेत जेवण घेतले मात्र त्याने नंतर उलट्या करण्यास सुरवात केल्याने त्याला सुरवातीला फोंडा आयडी उपजिल्हा इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पण प्रकृती बिघडल्याने त्याला बांबोळी इस्पितळात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले पण तेथे उपचार सुरु असताना जोहराभाईचे आज सोमवारी संध्याकाळी निधन झाले. मयत युवकाचे आई वडील गुजरातला असून मृतदेह बांबोळी शवागारात ठेवण्यात आला आहे. फोंडा पोलिस अधिक तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa News Live: ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ ट्रक दरीत कोसळला

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

SCROLL FOR NEXT