वास्को : मुरगाव मतदारसंघात राजकीय वातावरण तापले. भाजपच्या स्क्रीनवरून प्रचार करणाऱ्या रिक्षाचालकास मारहाण, तसेच स्क्रीनची मोडतोड व रिक्षावरील भाजप नेत्यांच्या फोटोला काळे फासल्या प्रकरणी मुरगाव पोलीस स्थानकात आठ जणांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यापैकी उमेश मांजरेकर (वय 48) व मनोज मांजरेकर (वय 51) यांना रात्री उशिरा अटक करण्यात आली.
पोलिसांच्या (police) माहितीनुसार, रविवारी संध्याकाळी 6 वाजता हेडलँड सडा येथील प्रिंन्स बेकरीजवळ भाजप प्रचार रिक्षातून एलसीडी स्क्रीनद्वारे सुरू होता. यावेळी तेथे शेखर दाभोलकर, सचिन भगत, राज हलवाई, अक्षय होन्नावरकर, शंकर पोळजी, उमेश मांजरेकर, जयेश शेटगावकर आणि मनोज मांद्रेकर आले. त्यांनी रिक्षाचालक संतोष पडणकट्टी याला शिवीगाळ केली. तसेच स्प्रे पेंटचा वापर करून एलसीडी स्क्रीन आणि रिक्षावरील बॅनर आणि मालमत्तेचे नुकसान केले. तसेच एकाने तक्रारदाराचा मोबाईल फेकून दिला. भाजपचा (BJP) प्रचार केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिली.
दरम्यान, या विषयी तक्रार संतोष पडनकट्टी यांनी रात्री मुरगाव पोलीस स्थानकात आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. रात्री उशिरा उमेश मांद्रेकर व मनोज मांद्रेकर यांना अटक करण्यात आली. मुरगाव (Mormugao) पोलिस निरीक्षक अजित उमारे पुढील तपास करत आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.