Guirim Porvorim flyover Dainik Gomantak
गोवा

Porvorim: सर्वत्र धूळच धूळ! पर्वरी महामार्गावरील वाढती समस्या; वाहनचालकांसाठी प्रवास त्रासदायक

Porvorim Flyover: उड्डाणपुलाच्या कामामुळे येथील वाहतुकीला ब्रेक लागला पर्यायी मार्ग नसल्याने उड्डाणपुलाचे काम सुरू असलेल्या मार्गावरच तात्पुरते बगल रस्ते उभारून वाहतूक रेटली जात आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

बार्देश: गिरी ते पर्वरी दरम्यानच्या महामार्गावर उड्डाण पूल उभारण्याचे काम सुरू असल्याने येथील वाहतूक व्यवस्थेची तीनतेरा वाजले असताना आता धूळ प्रदूषणामुळे या मार्गावरील प्रवास आणखीनच त्रासदायक झाला आहे.

त्यामुळे या धुळीला आवरा अशी याचना वाहनचालक व प्रवासी करू लागले आहेत. राजधानी पणजी बरोबरच गोव्याच्या अन्य भागांना जोडणारा हा महत्त्वाचा महामार्ग असल्याने या मार्गावर अखंड वाहतूक सुरू असते.

मात्र उड्डाणपुलाच्या कामामुळे येथील वाहतुकीला ब्रेक लागला पर्यायी मार्ग नसल्याने उड्डाणपुलाचे काम सुरू असलेल्या मार्गावरच तात्पुरते बगल रस्ते उभारून वाहतूक रेटली जात आहे. मात्र या बगल रस्त्यांची सध्या दैना झाली आहे. रस्त्यात सर्वत्र पडलेले खड्डे आणि उबणारी धूळ यामुळे हा प्रवास नकोसा होत आहे.

यामुळे वाहनचालकांमुळे प्रवासीही वैतागले आहेत. या रस्त्यावर सतत वाहतूक सुरू असल्याने धुळीचे समस्या मोठी आहे, हे धूळ प्रदूषण कमी करण्यासाठी दिवसांतून किमान तीन ते चारवेळी रस्त्यावर पाणी मारणे आवश्‍यक आहे. परंतु याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. तसेच रस्त्यावर पाणी मारतानाही योग्य काळजी घेतली जात नाही.

पाणी मारण्याच्या नावावर धबाधब पाणी रस्त्यावर आतले जाते, त्यामुळे रस्ता चिखलमय होतो, त्यामुळे वाहतुकीला अधिक धोका निर्माण होतो. योग्य प्रमाणात पाणी रस्त्यावर शिंपडल्यास ही समस्या नियंत्रणात येऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women’s Asia Cup 2026: मैदानावर पुन्हा रंगणार भारत-पाक थरार! टीम इंडियाच्या वाघिणी सज्ज; मॅचची तारीख, वेळ आणि थेट प्रक्षेपणाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ठरली ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

SCROLL FOR NEXT